आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Start To Work For Fit The Meters To Household Plumbing From Samantar Contractor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुर्दंड: 'समांतर'ची सावकारी, 12% व्याजाने भरावी लागणार रक्कम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील घरगुती नळांना समांतरच्या कंत्राटदाराकडून मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. मीटरसाठी ग्राहकांकडून तीन हजार ६२१ रुपये आकारले जातात. मात्र, ही रक्कम भरण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी असून त्यावर मात्र १२ टक्क्यांप्रमाणे व्याज आकारण्यात येणार आहे, अशी माहिती उजेडात आली आहे.
या विषयी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी कागदपत्रे गोळा केली असून, त्यातून ही माहिती पुढे अाली आहे. अगोदर मुख्य जलवाहिनी, अंतर्गत वाहिन्यांचे काम झाल्यानंतरच मीटर बसवण्याचे ठरले आहे. मात्र, असे होताना दिसत नाही. काही ठिकाणी याला विरोध होत असला तरी मीटर बसवून त्याची रक्कम वसूल केली जात आहे. घरगुती अर्धा इंची नळाला हजार ६२१ रुपये आहेत.

दालनात बसून राहिलेल्या उपमहापौरांना पत्ताच नाही, शिवसेनेच्या भूमिकेवर महानगरपालिकेत नाराजी
नवी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला दुय्यम वागणूक देण्याचा अध्याय मागच्या पानावरून पुढे सुरू केला आहे. सोमवारी शहरात दोन ठिकाणी समांतर जलवाहिनीच्या पाइपलाइनच्या कामांचे थाटात उद्घाटन करण्यात आले, पण या कार्यक्रमाला ना उपमहापौरांना बोलावण्यात आले होते ना भाजपच्या कुणा पदाधिकाऱ्यांना. यावरून शिवसेना भाजपमधील शीतयुद्धाला नव्या महापालिकेत प्रारंभ झाला आहे.
मनपात मोठा भाऊ असणाऱ्या शिवसेनेने गेल्या दोन दशकात भाजपला कायम पायाशीच ठेवले होते. प्रत्येक बाबीत दुय्यम वागणूक दिली जात असे. गेल्या पाच वर्षांत तर पार हमरीतुमरीपर्यंत हे मतभेद गेले होते. मनपात भाजपचे संख्याबळ वाढल्याने त्यांनी अपक्षांची मजबूत मोट बांधल्याने शिवसेना थोडी नरम होईल असे वाटत होते, पण प्रत्यक्षात तसे झालेले नाही. भाजपला महत्त्वाच्या वेळी डावलण्याचे प्रकार मनपात औपचारिकरीत्या सुरू झाले. या दाेन्ही उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमांना भाजपच्या एकाही नेत्याला, पदाधिकाऱ्याला बोलावण्यात आले नव्हते. उपमहापौर प्रमोद राठोड मनपात होते. त्यांना पत्रकारांनी समांतरच्या उद््घाटनाबाबत विचारले असता, ‘आँ? आज होते उद््घाटन? असा प्रतिप्रश्न करीत आपल्याला कळवण्यातही आले नाही असे सांगितले. भाजपच्या कुणालाच या कार्यक्रमाचा पत्ता लागू देण्यात आला नव्हता असे समजते.
खैरेंनाही फोन : संतापलेल्या राठोड यांनी हा प्रकार अतिशय चुकीचा असून मला पदाधिकारी या नात्याने कळवायला हवे होते. समांतर जलवाहिनी ही काही एका पक्षाची जलवाहिनी नाही, अशी प्रतिक्रिया दिली. अस्वस्थ राठोडांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना फोन करून मला का सांगण्यात आले नाही, असे विचारले. त्यांच्या उत्तराने राठोड यांचे समाधान झाले नाही. त्यांनी नंतर खासदार चंद्रकांत खैरे यांना फोन करून नाराजी व्यक्त केली.
नव्या संघर्षाला प्रारंभ : समांतरच्याया उद््घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप शिवसेनेतील संघर्षाला प्रारंभ झाला आहे. या वेळी भाजप अधिक आक्रमक होऊन शिवसेनेच्या दादागिरीला चाप लावण्याच्या तयारीत आहे. आज पडलेली ठिणगी ही पुढील पाच वर्षांत वेळोवेळी उभ्या राहणाऱ्या बखेड्यांची नांदी समजली जात आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पाइप आले, उद्घाटन केले...