आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजिंठा, वेरूळ लेणींसाठी बस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा, वेरूळ लेणींसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने दोन पर्यटन बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात दोन अत्याधुनिक सेवासुविधा असलेल्या व्होल्व्हो बस पर्यटकांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती मंडळाचे विभाग नियंत्रक रा. ना. पाटील यांनी दिली.

औरंगाबादला मकबरा, पाणचक्की, नहर-ए-अंबरी, सोनेरी महाल, वस्तुसंग्रहालय, साताऱ्याचे हेमाडपंती खंडोबाचे मंदिर, पैठणची संत एकनाथांची समाधी, नाथसागर, दौलताबादचा किल्ला, खुलताबादचा भद्रा मारुती, औरंगजेबाची कबर, वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, म्हैसमाळ, गौताळा अभयारण्य आदी पर्यटनस्थळांचा वारसा लाभला आहे.
अशी असेल बससेवा
- वातानुकूलित बसमध्ये ४५ आसने असतील. ही बस वेरूळकडे सकाळी ८.३० वाजता निघेल. रात्री ८.३० वाजता शहरात परत येईल. दौलताबादचा किल्ला, खुलताबादचा भद्रा मारुती औरंगजेबाची कबर आदी पर्यटनस्थळांना भेटी देता येईल.

- अजिंठ्यासाठी ही बस सकाळी वाजता निघेल, रात्री वाजता परत येईल. पर्यटकांना सत्य माहिती देण्यासाठी तज्ज्ञ गाइड्सची सोय असेल. या दोन्ही बसेसना वेरूळ आणि अजिंठ्याचे महत्त्व सांगणारी चित्रे बसमध्ये लावण्यात येणार आहेत.
ही आहेत उद्दिष्टे...
पर्यटकांना चांगली सेवा मिळेल. जास्तीत जास्त पर्यटक स्थळांकडे आकर्षित करून पर्यटकांची संख्या वाढेल, उत्पन्नातही वाढ होईल, पर्यटकांचा वेळ, पैसा वाचेल आणि त्यांची होणारी फसवणूक थांबेल. सुरक्षित प्रवासाची हमी राहील.
एक महिना लागेल
- वरिष्ठ पातळीवरून बस सुरू करण्याची तयारी झाली आहे. महिनाभरात प्रक्रिया पूर्ण होईल.
रा. ना. पाटील, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळ
बातम्या आणखी आहेत...