आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Starting Of ATS Inquary Mirza Beg Committed Suicide

एटीएसने चौकशी सुरू केल्याने मिर्झा बेगची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अतिरेक्याशी संबंध असल्याचे पुरावे आणि जबाबात नाव आल्यानंतर मुंबई एटीएसने चौकशी सुरू केल्यानंतर मिर्झा रिझवान बेग याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, त्याने एटीएसच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. हैदराबाद स्फोटानंतर एनआयए (राष्ट्रीय तपास यत्रंणा)ने त्याची कसून चौकशी केली होती.

मिर्झा हा पुणे येथील र्जमन बेकरी बॉम्ब स्फोटातला आरोपी हिमायत बेग याचा मामेभाऊ आहे. त्याने मिर्झाला 40 हजार रुपये दिले होते. त्यामुळे मुंबई क्राइम ब्रँच, एटीएस मुंबई आणि एएनआय यांनी त्याची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर मिर्झा मनोरुग्ण झाला होता. त्याच्यावर तीन महिन्यांपूर्वी पैठणरोड येथील शांती नर्सिग होममध्ये उपचारही करण्यात आले होते. जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मराठवाड्यातील अतिरेकी कारवायांशी संबंध असलेल्यांची नावे पुढे आली. त्यात मिर्झा रिझवान यांचेही नाव आले. जबिउद्दीन अन्सारीने अब्दुल राखे (बीड) यांच्यामार्फत मिर्झाकडे 40 हजार रुपये पाठवले. ते पुणे येथे कासीब जियाबानी याला पोहोचते करायचे होते. रिझवानने हे पैसे जियाबानी याला देण्यासाठी गेला होता. मात्र त्याने ते पैसे घेतले नाही. त्यामुळे हे पैसे रिझवानने स्वत:जवळ ठेवून घेतले. या सर्व बाबी अन्सारी यांच्या जबाबात आल्यानंतर मुंबई क्राइम ब्रँचने मिर्झाला ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच मुंबई एटीएस, एनआयएनेही त्यांची चौकशी केली. या चौकशीत रिझवान हैराण झाला. चौकशीमुळे त्याची भीती वाढली व तो मनोरुग्ण झाला. तीन महिन्यांपासून त्यांच्यावर शांती नर्सिग होममध्ये उपचार सुरू होते. आठवडाभरापूर्वीच त्याला हॉस्पिटलमधून घरी आणले होते. त्यानंतर रविवारी सायंकाळी त्याने आत्महत्या केली. त्याचाच एक साथीदार फहात 2007 मध्ये जम्मू काश्मीर सीमेवर मारला गेला होता.

एनआयएने केली तपासणी

एनआयएने हैदराबाद येथील बॉम्बस्फोटानंतर आणि पूर्वीही शहरात येऊन अतिरेक्याशी संबंध असणार्‍याची चौकशी केली असल्याचे वृत्त होते. तेव्हा मिर्झा रिझवानसह तीन जणांची चौकशी केली होती. त्यापैकी दोन जण शहरातील रहिवासी आहेत.


मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
मुंबई एटीएसच्या अधिकार्‍यांनी छळ केल्यामुळे माझ्या भावाने आत्महत्या केली आहे. चौकशीत त्याला त्रास दिला गेला त्यामुळे तो मनोरुग्ण झाला आणि त्याने आत्महत्या केली आहे. छळ केलेल्या अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करत नाही तोपर्यंत मिर्झा रिझवान बेग यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असे रिझवान याचा मोठा भाऊ मिर्झा शहानवाज बेग यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.