आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात अॅम्ब्युलन्स सेवेला रिकामटेकड्यांचा ताप, तब्बल 23 लाख काॅल ठरले उपद्रवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाची सेवा देणा-या ‘१०८’ या अॅम्ब्युलन्स सेवेला रिकामटेकड्यांचा चांगलाच ताप झाला आहे. गेल्या वर्षभरात या सेवेला अालेल्या २५ लाख फाेन काॅलपैकी बहुतांश म्हणजेच २३ लाख कॉल हे बिनकामाचे असल्याचे समाेर अाले अाहे.
यापैकी फेक कॉल करणा-यांची संख्या २० टक्के आहे. असे खाेटे काॅल करणाऱ्या राज्यातील अाठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत. अापत्कालीन रुग्णांना तासाभरात रुग्णालयात पाेहाेचवण्यासाठी सरकारने ‘अॅम्ब्युलन्स अाॅन काॅल’ ही सुविधा गेल्या प्रजासत्ताकदिनी सुरू केली. देशातील ११ राज्यांमध्ये या सुविधेचा वापर केला जात आहे . मात्र या सेवेसाठी ‘१०८’ या टाेल फ्री क्रमांकावर बिनकामाचे काॅल्स करून यंत्रणेला वेठीस धरण्याचे प्रकार हाेत अाहेत.

1.92 लाख रूग्णांचे वाचले प्राण
या याेजनेतून वर्षभरात १ लाख ९२ हजार ४५ रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश अाले अाहे. त्यापैकी सर्वाधिक २७,८७५ रुग्ण रस्ते अपघातातील , २०८१ रुग्ण हृदयविकाराचे, ७५,३०७ रुग्ण अात्महत्येचा प्रयत्न व सर्पदंशाचे हाेते. त्याशिवाय ५३,९१५ महिलांना प्रसूतीच्या वेळी उपचार मिळवून देत त्यांचे व बाळाचे प्राण वाचवण्यात यश अाले अाहे.
काॅल्सचे प्रमाण असे
जानेवारी २०१४ ते जानेवारी २०१५ या काळात या सेवेच्या नियंत्रण कक्षात महाराष्ट्रातून सुमारे २५ लाख २८ हजार ७४६ कॉल आले. त्याची वर्गीकरण खालीलप्रमाणे केले अाहे.
२० % खाेटे काॅल्स
12 % माहिती विचारण्यासाठी
43 % मिसकॉल, नो रिस्पॉन्स कॉल
01 % डाॅक्टरांचे अभिनंदन
03 % अपशब्द बाेलणारे
0.50 % सल्ला देणारे
02 % वैद्यकीय माहिती विचारणारे