आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनमोहनसिंग ओबेरॉय रिंगणात; ‘अबकी बार मैं’च; पण पवार म्हणाले तर बघू!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दरवेळी आम्हीच का मागे राहायचे, किती दिवस इतरांसाठी काम करायचे, असे सवाल करीत माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी विधान परिषद निवडणुकीत आपण उमेदवार असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आदेश आला तर बघू, नाही तर ‘अबकी बार मैं’च असे त्यांनी सांगितले.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असताना विधान परिषद निवडणुकीत ओबेरॉय यांनी उमेदवारी दाखल केली आहे. आपण निवडणूक लढवणारच असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी रविवारी एक पत्रकार परिषद बोलावली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काशीनाथ कोकाटे यांच्यासह औरंगाबाद मनपा, गंगापूर, खुलताबाद नगर परिषदांतील नगरसेवक, नगरसेविकांचे पती हजर होते.

ओबेरॉय म्हणाले की, जातीयवादी पक्षांना रोखा, असे सांगत कायम अल्पसंख्याकांना मागे ठेवले जाते. दरवेळी जुन्या आणि अनुभवींना नाकारून पैसेवाल्यांना तिकीट दिले जाते. या वेळीदेखील आम्हाला विचारात न घेता काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. दरवेळी आम्ही काँग्रेसला मदत करत आलो, पण आता नाही. आपल्यासोबत राष्ट्रवादीसह अपक्ष, काँग्रेस, शहर प्रगती आघाडीचे मिळून 25 नगरसेवक आहेत. या सर्वांना मी बाजू समजून सांगितल्यानंतर त्यांच्या आग्रहानंतर मी उमेदवारी जाहीर केली आहे.

हे राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंड आहे का, असे थेट विचारले असता, या क्षणापर्यंत पक्षाने आम्हाला काही सांगितलेले नाही. सूचना, आदेश नसल्याने आपण निवडणूक लढवणारच आहोत.