आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद बँकेकडून कर्ज वाटपासाठी "तारीख पे तारीख'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा- स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेत शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी "तारीख पे तारीख' दिली जात आहे. यामुळे ही बँक आहे की न्यायालय असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहे.
सकाळी शेकडो शेतकरी बँकेत आलेले असूनही त्यांना केवळ दुपारचे दोनच तासच दिले जात असल्याने, अनेक शेतकऱ्यांना आपला दिवस वाया घालवून रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने आवाज चढवला तर त्यास चक्क आठ ते दहा िदवसानंतरची तारीख दिली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

सकाळपासूनच रांगा
बँकेचा व्यवहार सकाळी दहा नंतर सुरू होतो. मात्र, कर्जवाटपाप्रसंगी होणारी गर्दी लक्षात घेता, अनेक शेतकरी आपला पहिला नंबर लागावा, यासाठी सकाळच्या सहा वाजेपासून बँकेसमोर रांगा लावतांना पहावयास मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...