आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Board Of Secondary Higher Secondary In Aurangabad

तांत्रिक अडचणीत अडकले साडेतीन हजार गुरुजींचे मानधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी -
Paragraph Filter
अर्थात औरंगाबाद बोर्डाच्या परीक्षेसाठी गरुजींना स्वखर्चाने काम करावे लागते, परंतु यंदापासून त्यांचे हे मानधन देण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. त्याच्या तांत्रिक प्रक्रियेला विलंब लागत असल्याने जवळपास हजार ५१९ गुरुजींचे मानधन खोळंबले आहे. बोर्डाने यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असला तरी अद्याप गुरुजींना हे मानधन मिळालेले नाही.

औरंगाबाद बोर्डात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यांचा समावेश होेतो. येथे होणाऱ्या १० वी १२ वीच्या परीक्षांची जबाबदारी ही केंद्र संचालक सहायक केंद्र संचालकांवर असते. कस्टोडियनपासून परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका नेणे आणण्याची जबाबदारी ही केंद्र प्रमुखावर असते. यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च त्यांना आपल्या खिशातून करावा लागतो. नंतर हा पैसा बोर्ड त्यांना परत करते. तसेच या कामात परीक्षक, नियामक, नियंत्ंक यांचादेखील सहभाग असतो.

- बोर्डाचा निर्णय चांगला असला तरी योग्य नियोजनाअभावी अद्यापही आम्हाला पैसे मिळालेले नाही. याचा त्रास मात्र सामान्य शिक्षकाला होत आहे. कृष्णाराठोड, मुफ्टाशिक्षक संघटना
थेट सवाल
यापूर्वी गुरुजींचा खर्च हा निकालासोबत धनादेशाद्वारे दिला जात होता. मात्र, बोर्डाने सर्व कामकाज हे पेपरलेस करण्याचा निर्णय घेतल्याने या वर्षापासून मानधन हे थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
तांत्रिक अडचण
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १० १२ वीच्या परीक्षा पार पडल्या. यासाठी पाच जिल्ह्यांमधून १० वी साठी हजार ८४ केंद्र संचालक सहायक केंद्र संचालकांनी काम पाहिले. १२ वीच्या परीक्षेसाठी ६२ जणांनी काम केले. परीक्षेचा लागणारा खर्चही गुरुजींनी आपल्या खिशातून केला, मात्र ऑनलाइनची पद्धत यंदा आल्याने अद्याप हा पैसा गुरुजींना मिळालेला नाही.

कोटींची थकबाकी
दहावी आणि बारावी परीक्षेच्या या कामासाठी औरंगाबाद बोर्डात येणाऱ्या पाच जिल्ह्यांत केंद्र संचालक सहायक केंद्र संचालकांसह एकूण ११ हजार १८१ कर्मचारी होतात. या सर्व कर्मचाऱ्यांच्या मानधनाची रक्कम कोटी ३८ लाख ४२३ रुपये आहे. त्यातील निम्म्याअधिक कर्मचाऱ्यांचे पैसे त्यांच्या त्यांच्या जमा झाल्याचा दावा बोर्डाने केला आहे.

- केंद्र संचालक सह केंद्र संचालकांपैकी ६०० खातेदारांनी खाते क्रमांकच दिलेला नाही.
- ज्यांनी खाते क्रमांक दिले आहेत. त्यापैकी अनेकांनी बँकेचे आयएफसी कोडच दिलेला नाही.
- अनेकांनी परीक्षा केंद्राचे खर्च खाते पुस्तिकाच जमा केलेल्या नाहीत.
- १० वीच्या हजार ५०० खातेदारांची रक्कम २२ जुलैपर्यंत खात्यांत जमा केल्याचा दावा.
- १२ वीच्या अडीच हजार कर्मचाऱ्यांचे पैसे २२ जुलैपर्यंत खात्यात जमा केल्याचा दावा.
बोर्डाच्या परीक्षेचे मानधन थांबले आहे?

- या वर्षापासून शिक्षकांचे मानधन हे ऑनलाइन करण्यात आले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे खात्यावर टाकण्यास विलंब झाला आहे.

मगहे मानधन कधीपर्यंत मिळणार?
- बोर्डाकडून पाठपुरावा सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत हजारांच्या आसपास शिक्षकांचे मानधन जमा झाल्याचा अहवाल बँकेने आम्हाला दिला आहे. ज्यांची माहिती अपूर्ण आहे अशांचे पैसे बाकी आहेत.

असेकिती कर्मचारी आहेत?
- बँकेने आम्हाला याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.
अनेकांनीया प्रक्रियेस विलंब होत असल्याचा आक्षेप घेतला आहे?
- थेट खात्यात पैसे जमा होणे हा चांगला निर्णय आहे. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू राहावी यासाठी वेळ जात आहे. शिक्षकांनी थोडे सहकार्य करणे अपेक्षित आहे. ज्यांची माहिती अपूर्ण आहे अशांनी ती दिल्यास दोन दिवसांत पैसे वर्ग करण्याचे आश्वासन बँकेने दिले आहे.