आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बल्लापूरातून चारवेळा निवडून आले आहेत अर्थमंत्री, असा आहे राजकीय प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजप सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उद्या (दिनांक, 18 मार्च) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प शेती उद्योगाला प्रोत्साहन देणारा राहील असे त्‍यांनी आधीच सांगितले आहे. त्‍यामुळे मुनगंटीवारांच्‍या बजेटमधून महाराष्‍ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेठली यांनी रोजगार निर्मितीवर भर देणारा व शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला. अशाच पद्धतीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यावर आपला भर राहणार असल्‍याची माहिती मुनगंटीवार यांनी महिन्‍याच्‍या सुरूवातीला नांदेड दौ-यावर असताना दिली होती. या संग्रहात जाणून घेऊया मुनगंटीवार यांच्‍या राजकीय प्रवासाबाबत थोडक्‍यात माहिती. चारवेळा आमदार..
- सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपुरातील बल्लापूर या मतदारसंघातून तब्बल चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
- युती सरकारच्या काळात त्यांनी पर्यटन, ग्राहक संरक्षण आदी खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.
- नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणूनही मुनगंटीवार यांची ओळख आहे.
- 1999 मध्ये युती शासनामध्ये ते प्रथम पर्यटन व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री होते.
- 31 ऑक्टोबर 2014 पासुन ते मंत्री ( वित्त आणि नियोजन, वने) महाराष्ट्र शासन या पदावर कार्यरत आहेत.
- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 54 हजार 999 कोटी रुपयांचा पहिला अर्थसंकल्प गेल्‍यावर्षी सादर केला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मुनगंटीवार यांचा राजकीय प्रवास..