आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State CM Aurangabad Dry Area Tour Issue At Marathwada

दुष्काळ’ मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याचा अन् कलेक्टरचाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुष्काळी भागाची हवाई पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा एक दिवसाचा झंझावाती दौरा होणार असल्याची चर्चा पंधरा दिवसांपासून आहे, तर 22 दिवसांपासून जिल्हाधिकारीपद रिक्त आहे. या दोन्हीही बाबींची फक्त चर्चाच असून प्रत्यक्षात येथेही दुष्काळच आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यासाठी आधी 18 व नंतर 22 जानेवारी ही तारीख निश्चित समजण्यात येत होती. आता या दोन्हीही तारखा टळल्या असून मुख्यमंत्री येणार कधी हे स्थानिक पातळीवर कोणीही सांगू शकलेले नाही. या आठवड्यात मुख्यमंत्र्यांचा दौरा होणार असे सांगण्यात आले होते. तारीख ठरलेली नव्हती, आता ते कधी येतील, हे सांगता येत नाही, अधिकृत दौरा जाहीर होईपर्यंत काहीही सांगता येत नाही, असे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले. दुसरीकडे मुख्यमंत्री येणार एवढेच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारीही सांगू शकत आहेत, पण मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याबाबत आम्हालाही काही माहिती नसल्याचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारीही मिळेना
जिल्हाधिकारी पदावर गेल्या 22 दिवसांपासून कोणीही नाही. विभागाचे मुख्यालय, दुष्काळाच्या झळा या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत शासनाने अजूनतरी हे पद भरलेले नाही. जिल्हाधिकार्‍याशिवाय काम अडलेले नसल्यामुळे फारसा फरक पडत नाही, असा दावा काँग्रेसचे आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केला आहे, तर आणीबाणीच्या वेळी जिल्हाधिकारी न देणे म्हणजे सरकार दुष्काळाबाबत किती निष्काळजी आहे, असा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.