आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State CM Chavan Comment On Rahul Gandhi Maharashtra Tour

राहुल गांधींच्या दौर्‍याने उत्साहाचे वातावरण- मुख्यमंत्री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन/वैजापूर- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौर्‍यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांनी महाराष्ट्रात दौरा करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे हा उत्साह अधिकच वाढल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते भोकरदन येथे आयोजित काँग्रेसच्या वचनपूर्ती जनजागरण यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. भोकरदन (जि. जालना) येथील नगर परिषद कार्यालयासमोरील मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती होती.

भोकरदनमध्ये 12 मिनिटांचे भाषण केल्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांची वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे सभा झाली. वैजापूर मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार आहे. डॉ. दिनेश परदेशी यांना काँग्रेसची उमेदवारी दिली जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी वैजापूरच्या सभेत केली.