आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीला शनिवारपासून प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून होणाऱ्या ५४ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीला १५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. यात औरंगाबाद केंद्राकडून १४ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. मातब्बर संस्थांनी आणि कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे या वेळी सामना चुरशीचा असणार आहे.
गेल्या वर्षी औरंगाबादच्या रंगकर्मींनी पुढाकार घेत औरंगाबादचे रद्द झालेले प्राथमिक फेरीचे सेंटर परत मिळवले तसेच दर्जेदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. आयोजकांनीही उत्तम नियोजन करून ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. कधी नव्हे तो औरंगाबाद येथील प्रेक्षकांनी तिकिटे काढून या स्पर्धेर्तील नाटके पाहिली. या वेळी ही अपेक्षा ठेवून शहरातील रंगकर्मींनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तापडिया नाट्यमंदिरात ही स्पर्धा होणार आहे.
औरंगाबाद-बीडचे एकच नाटक अंतिम फेरीसाठी : या वर्षी बीडचे केंद्र रद्द झाले आहे. त्यामुळे बीड येथील केंद्रावरील चार नाटके औरंगाबादेत होणार आहेत. मागच्या वेळी बीड आणि औरंगाबाद केंद्रातून दोन नाटके अंतिम फेरीसाठी गेली होती. आता मात्र एकच नाटक जाण्याची शक्यता आहे. मात्र १४ संघ सहभागी झाल्यामुळे किमान दोन नाटकांचा अंतिम फेरीसाठी विचार करावा, अशी मागणी कलाकारांकडून होते आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, नाटकांचे वेळापत्रक