आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Election Commission Study New Ward Structure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या वॉर्ड रचनेचा आयोगाकडून अभ्यास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या वॉर्ड रचनेचा ऑनलाइन आराखडा एकदाचा निवडणूक आयोगाकडे ओपन झाल्यानंतर आता आयोग त्याचा अभ्यास करत असून लवकरच त्यावर निर्णय होणार आहे. परिणामी तोपर्यंत आजी, माजी नगरसेवक व इच्छुकांचे देव पाण्यातच राहाणार आहेत.

एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीत नवीन वॉर्ड रचना असल्याने व संख्याही वाढणार असल्याने त्याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. कोणते वॉर्ड वाढणार, कोणते तोडणार, कोणते गायब होणार यावर खल सुरू आहे. मनपा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन वॉर्ड रचनेचा अहवाल व आराखडा दोनदा ऑनलाइन पाठवला; पण सॉफ्टवेअर न जुळण्याच्या तांत्रिक अडचणींमुळे पेच निर्माण झाला होता. नंतर कागदोपत्री अहवालही सादर करण्यात आला. आता नव्याने पाठवलेला ऑनलाइन अहवालही ओपन झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितले की, अहवालाचा अभ्यास सुरू आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल. सातारा देवळाईचा भाग नगर परिषद न करता मनपात समाविष्ट करावा, असा प्रस्ताव मनपाच्या सर्वसाधारण सभेत येत आहे, त्याचा कामावर काही परिणाम होऊ शकतो का, असे विचारले असता सहारिया यांनी त्याचा काही संबंध नसून आमचे काम जसे ठरले आहे तसेच सुरू आहे. सातारा, देवळाईबाबत निर्णय घेणे हा सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यावर सरकार काय तो निर्णय घेईल. आम्ही निवडणुकीच्या तयारीच्या कामाला लागलेलो आहोत, असेही ते म्हणाले.