आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिस्किटांच्या कार्टनमध्ये लपवली दारू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बिस्किटांच्या कार्टनमध्ये विदेशी दारू नेणा-या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून लाख १२ हजार रुपये किमतीचे दारूचे बॉक्स, एक इंडिका जप्त करण्यात आली आहे. काटे पिंपळगाव, ता. गंगापूर येथील अप्पासाहेब पिंपळे, बाबासाहेब गव्हाण हे कार्टनमध्ये दारू नेत असल्याची माहिती मिळताच गुरुवारी रात्री १२.३० वाजता आसेगाव फाट्याजवळ पथकाने सापळा रचला.
एमएम २० बीसी ३६९६ क्रमांकाच्या इंडिका कारमध्ये विदेशी दारूचे पाच बॉक्स मिळाले. त्यामध्ये बॅगपायपर, इम्पीरियल ब्ल्यू आणि दोन मोबाइलसह कार जप्त करण्यात आली. पथकात विशेष प्रभारी निरीक्षक शिवाजी वानखेडे, आयुक्त पवार, सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. आर. फटांगळे, ए. बी. चौधरी, जवान अनिल जायभाये, किशोर ढाले, अनिल मेहरे यांचा समावेश होता.