आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरी हॉकीपटूची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यस्तरीय हॉकीपटूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) सकाळी छावणी परिसरात उघडकीस आली. राकेश ऊर्फ सोनू सुभाष कंटेलू (३१, रा. सुभाष पेठ, छावणी) असे या खेळाडूचे नाव आहे. राकेश याने इअर फोन लावून गाणे ऐकत आत्महत्या केली असावी, अशी शक्यता आहे.
राकेश याचे छावणी भागातील सुभाषपेठेत वडिलोपार्जित घर आहे. याच भागात त्याच्या मोठ्या भावाने एक खोली भाड्याने घेतली आहे. या घरात गुरुवारी रात्री कोणीही नव्हते. नऊच्या सुमारास मित्रांना भेटून तो थेट या खोलीवर गेला. रात्री उशीर झाला तरी तो घरी का परतला नाही म्हणून आईवडिलांनी तसेच मित्रांनी त्याला कॉल केला. मात्र, रात्री बारापर्यंत त्याचा मोबाइल बंद होता. शुक्रवारी सकाळी पावणेसातला मोठा भाऊ खोलीत गेला असता हा प्रकार उघडकीस आला. राकेशने छताच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेतला होता. खोलीचा दरवाजा आतून लावलेला नव्हता. त्याच्या कानाला इअर फोन लावलेला होता. मात्र, मोबाइल बंद पडला होता. त्याने शेवटचा फोन कोणाला केला होता हे मात्र कळू शकले नाही, असे त्याचा मित्र नितीन परदेशी यांनी सांगितले. राकेश राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत सहभागी झाला होता, अशी माहिती हॉकी संघटनेचे पदाधिकारी डॉ. प्रदीप खांड्रे यांनी दिली. तो सध्या खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याचे वडील सुभाष एसटीचे निवृत्त कर्मचारी, तर मोठा भाऊ बँकेत काम करतो. दुसरा भाऊ खासगी नोकरी करताे. राकेशच्या आत्महत्येच्या कारणांचा छावणी पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...