आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Irrigation Minister Girish Mahajan Comment On Dam Issue

नको तिथे धरणे बांधली : गिरीश महाजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पंधरा ते वीस वर्षे सत्ता असताना पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही, केवळ दादागिरी करत जायकवाडी धरणाच्या वरील भागात नको तेथे धरणे बांधल्याने आज मराठवाडा कोरडा पडला आहे. या पुढे मराठवाड्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता मुख्यमंत्री व मी स्वत: घेत असल्याचे मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार संजय वाघचौरे, रवींद्र काळे, जितसिंग करकोटक, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, गंगाधर गाडे, विक्रम काळे, रावसाहेब नाडे आदी उपस्थित होते.

शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे झाले अनावरण
विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अब्दुल सत्तार, रवींद्र काळे, माजी आमदार संजय वाघचौरेंच्या उपस्थितीत गिरीश महाजनांच्या हस्ते शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.