आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या विधानाचा ब्राह्मण संघाकडून निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लातूरच्या सभेत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भ्यायला मी काय ब्राह्मण आहे का, असे विधान केले होते. या विधानाचा अ. भा. ब्राह्मण संघटनेने निषेध केला असून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. 
 
इतर अनेक संघटना ब्राह्मण समाजाला शिवीगाळ आणि बदनामी करतात. त्यांच्यावर कारवाई करावी, परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 
 
या वेळी सतीश मंडपे, नारायण पांडव, सुरेश जोशी,अनिरुद्ध गावपांडे, मिलिंद पिंपळे, शिल्पा जोशी, संपदा जोशी, ओंकार जहागीरदार, कमलेश कस्तुरे उपस्थित होते. 
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ ब्राह्मण समाज समन्वय समितीने मंगळवारी औरंगपुरा येथे निषेध नोंदवला. 
बातम्या आणखी आहेत...