आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात पाहून पळू नका, मदत करा; सन्मान करू- दिवाकर रावते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अपघात झाल्याचे दिसताच पोलिस कारवाईच्या भीतीने पळून जाता अपघातग्रस्तांना त्वरित मदत करा, तुमचा सन्मान केला जाईल, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. 26 व्या केंद्रीय पाचव्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान समारोपप्रसंगी ते बोलत होते.
रावते म्हणाले, सुरक्षा सप्ताह केवळ नावाला राबवला जात आहे. सुरक्षेबाबत इंग्रजीत घोषवाक्ये असतात. ती मराठी लोकांना काय कळणार? ज्या महत्त्वाच्या बाबी सर्वांपर्यंत पोहोचायला हव्यात त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. सोयीप्रमाणे अभियान राबवून फायदा होणार नाही. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत अपघातांच्या संदर्भात बैठक झाली होती. यात देशात १२ लाख ५० हजार लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. रस्ते अपघातात भारत जगात दुसरा असून दरवर्षी एक लाख ६५ लोकांचा मृत्यू होतो. देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून येथे १२ हजार ५०० लोकांचा जीव जातो. अपघात कमी व्हावेत यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. कायदे तयार होत आहेत. राज्य परराज्यातील ६० हजार बस राज्यात धावतात. यापैकी अर्ध्या वाहनचालकांना वाहन चालवण्याचे ज्ञान नसते. राज्यात ८० हजारांपेक्षा जास्त ट्रक चालतात, त्यांना वाहन चालवण्याचे शास्त्रशुद्ध धडे दिले जात नाहीत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. त्यासाठी परिवहन विभागाने जबाबदारी ओळखून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ता सुरक्षेसंदर्भात शालेय मुलांना नियम माहिती व्हावेत यासाठी विद्यालय, महाविद्यालयात सीडी वाटप केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अभियानांतर्गत शहरातील ६५ स्कूल बसची तपासणी केली असता १७ स्कूलबस दोषी आढळल्याचे अहवालात नमूद आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाला जी. सी. गवई, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, नगरसेवक राजू वैद्य, राजू बागडे आदींची उपस्थिती होती. राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान समारोपप्रसंगी डावीकडून नगरसेवक रेणुकादास वैद्य, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे,

इच्छा पूर्ण करणार
वाहतूकसुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपतील काही नेत्यांची उपस्थिती होती. बहुतेककरून सर्व रावते समर्थक या वेळी हजर होते. अंबादास दानवे आणि राजू वैद्य यांची आमदार होण्याची इच्छा अपूर्ण राहिली असून ती पूर्ण करणार असल्याचे रावते यांनी सांगितले.
जास्त पैसे घ्या; पण उत्तम चालक बनवा
ड्रायव्हिंगस्कूलच्या संचालकांनीही अधिक शुल्क घ्यावे, पण उत्तम चालक निर्माण करावेत, असे आवाहन त्यांनी केले. एका दिवसात अष्टविनायक दर्शन प्रवासासाठी चालकाला १८ ते २४ तास ड्रायव्हिंग करावी लागते. अशा वेळी अपघात होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कार्यकर्त्यांची पाठराखण कुठल्याही राजकीय व्यक्तीने करू नये, असे ते म्हणाले.
यांचा झाला गौरव
वाहनचालकराहुल नवपुते, शिवाजी काकडे, किरण दळवी, श्रीकांत मेनकुदळे, प्रा. चौधरी, डॉ. का. ना. विधाटे चित्रकला स्पर्धेतील विजेते विद्यार्थी एन. बी. किरडे, एस. एन. बनसोड, बाळासाहेब गाडे, मनीषा लोखंडे, आदित्य जाधव, आरती वानखेडे, पल्लवी दापके, मंजू माळी, शंकर माळी यांचा रावते यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.