आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Transport Corporation's Two Officers Suspended

एसटी महामंडळाचे दोन अधिकारी निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केल्यामुळे सहायक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रकावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी एस. एस. रायलवार यांनी दिली. कोल्हापूर-जालना या बसमध्ये दोन प्रवासी फुकट प्रवास करत होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली, पण त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली नाही. या बसची सुरक्षा खात्यामार्फत तपासणी केली असता, त्यामध्ये दोन विनातिकीट प्रवासी आढळले. दरम्यान, इंदापूरजवळ एसटीचे सहायक वाहतूक निरीक्षक एन. पी. पांढरे, वाहतूक नियंत्रक एस. डी. महारगुडे या दोन्ही अधिकाऱ्यांनी एसटीची तपासणी केली होती. थोड्या अंतरावर जालन्याच्या सुरक्षा पथकाने त्या बसची पुन्हा तपासणी केली असता दोन प्रवासी विनातिकीट आढळले. या करणावरून मंगळवारी या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.