आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकर हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचे पुरस्कर्ते, डॉ. भीमराव भोसले यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीमुळे भारतीय समाज हा आदर्श समाज होऊ शकतो या तत्त्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास होता. हे तत्त्व वैश्विक असून या तत्त्वामुळेच भारताचा आणि पर्यायाने आपला विकास होऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  सर्वसमावेशक  असल्याकारणाने त्यांचे विचार नेहमीच अनुकरणीय राहतील, असे प्रतिपादन डॉ. भीमराव भोसले यांनी केले. शनिवारी ते विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.  

व्याख्यानमालेचे उद्घाटन विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. सुहास मोराळे यांनी केले. त्यांनी विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या वेळी महाविद्यालयात आयोजित विविध उपक्रमाची स्तुती केली. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिंमतराव नरके हे होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून वाचनाचा गुण घेतला पाहिजे असे आवाहन केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय सांभाळकर होते. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रामचंद्र काळुंखे हे उपस्थित होते. 
  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सूर्यकांत संभाळकर यांनी केले. यावेळी प्रा. तुकाराम कोल्हे, डॉ. गुलाब शेळके, प्रा. अमोल भोसले, प्रा. मकरंद जोशी  आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केशव मोरे यांनी केले, तर आभार प्रा. संतोष प्रसाद यांनी मानले.
बातम्या आणखी आहेत...