आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या विभाजनाची भाषा खपवून घेणार नाही : पालकमंत्री रामदास कदम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकमंत्री रामदास कदम यांनी पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा गौरव केला. हवालदार राजेश बनकर, विकास माताडे यांचा सत्कार करण्यात आला. - Divya Marathi
पालकमंत्री रामदास कदम यांनी पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा गौरव केला. हवालदार राजेश बनकर, विकास माताडे यांचा सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद- संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ जणांनी बलिदान दिले. त्यामुळे महाराष्ट्र तोडण्यापेक्षा कर्नाटकातील बेळगाव, धारवाड हे मराठी भाषक क्षेत्र महाराष्ट्राला जोडण्याचा प्रयत्न करावा. यापुढेही छत्रपती शिवरायांचा संयुक्त महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्याचे पर्यावरणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिला. 

महाराष्ट्रदिनी पोलिस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पोलिस दलातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांना पोलिस महासंचालकांचे पदक प्रमाणपत्र त्यांनी प्रदान केले. या वेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
गौरवण्यात आलेल्यांमध्ये १५ वर्षे पोलिस खात्यात सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश होता. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना राज्य शासनाचे आंतरिक सुरक्षा पदक देण्यात आले. विशेष पुरस्कारासाठी राज्यातील २२ जणांची, तर पोलिस महासंचालक पदकासाठी ७२० अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात औरंगाबाद शहर, ग्रामीण, राज्य राखीव पोलिस दल, मानवी हक्क संरक्षण विभागातील ३० पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश होता. 

सत्कार सोहळ्याला जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, आमदार इम्तियाज जलील, महापौर बापू घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, मनपा आयुक्त डी. एस. मुगळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या वेळी ग्रामपंचायत, उद्योजक यांचा पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महसूल विभागातील उपायुक्त, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह २५ अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. ग्रापंचायतीची स्वच्छता दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, नवीन तंत्रज्ञानाबाबत चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना १० लाखांचा पुरस्कार देण्यात आला. 

या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा झाला सत्कार...
पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल खटावकर, विजय घेरडे, साईबाबा गिते, राहुल रोडे, पी.एस. आय. सागर कोते, सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे, सहायक फौजदार सय्यद इस्माईल, साईनाथ महाडिक, पोलिस हवालदार, राजेश बनकर, सुनील धुळे, शेख मोहंमद, भाऊराव राठोड, बंडू पगारे, संजय काळे, कैलास सनासे, दिलीप राठोड, सय्यद मुजीबअली, गोकुळ वाघ, संजय बहिरव, पोलिस नाईक पोपट काकडे, गणेश शिंदे, दत्तात्रय गाढेकर, संजय वाघचौरे, दत्ता ढंगारे, सुनील पाटील, पोलिस शिपाई विकास माताडे, श्रीमती भुमरे, पोलिस हवालदार राजेंद्र मोरे, कैलास कोहिले, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा ग्रामीण यशवंत जाधव, ग्रामीण पोलिस दलातील ए. के. चौधरी, स.पो.नि. जीविशा, बी.आर. एरंडे, ए.टी.सी. सेल ग्रामीणचे हेडकॉन्स्टेबल एम.आर. मोरे, पोलिस नाईक रफिक शेख, सहायक फौजदार कचरू चव्हाण, पोलिस हवालदार रामभाऊ खंडागळे आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी गौरवण्यात आले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा राष्ट्र उभारणीत महाराष्ट्राचे मोठे योगदान; कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांचे प्रतिपादन...
 
बातम्या आणखी आहेत...