आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीला आमचा विरोध नाही, आम्हाला नदी नाले खोल करू द्या : खा. रावसाहेब दानवे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- कर्जमाफीला आमचा विरोध नाही, पण एकदा कर्ज माफ केले की शेतकऱ्याला परत कर्ज घेण्याची गरज पडली नाही पाहिजे तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि तोपर्यंत शेतीवर सरकारने गुंतवणूक केली पाहिजे. आम्हाला नदी नाले खोल करू द्या, रुंदीकरण करू द्या, सिमेंटचे बंधारे बांधू द्या, मागेल त्याला कनेक्शन देऊ द्या, मागेल त्याला शेततळे देऊ द्या हे आमचे सूत्र आहे हे पहिल्यांदा एकदा हे होऊन शेतकरी सक्षम झाला तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि त्यानंतर शेतकरी कर्जच घेणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करू हे आमच्या सरकारचे धोरण आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी तालुक्यातील वाघलगाव येथे आयोजित कार्यक्रमात केले.   

वाघलगाव येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन वाघलगावकऱ्यांनी केले होते. या वेळी सर्वप्रथम  मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल, अनुराधा चव्हाण व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सर्जेराव मेटे, नाथाजी काकडे, एकनाथ धटिंग, संजय त्रिभुवन, सविता फुके, ऐश्वर्या गाडेकर, सोनाली सोनवणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार 
करण्यात आला. 

याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री नामदेव गाडेकर, जालना जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव, सरचिटणीस सुहास शिरसाठ, युवक जिल्हाध्यक्ष विजय औताडे, तालुकाध्यक्ष गोविंद वाघ, कल्याण चव्हाण, तारूअप्पा मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, कर्जमाफी विरोधी पक्षाने केली तर ठीक आहे, पण आता आमचे मित्रपक्ष मागणी करू लागले ते पण विरोधकांबरोबर विधानभवनाच्या दारावर येऊन बसू लागले. आता विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हे आम्हाला कळूच नाही राहिले. खरी पोटदुखी काय तर चार नंबरचा पक्ष एक नंबरवर आला हा आता आपल्या बापाला सुधरू देणार नाही. त्यामुळे याला करता येईल तेवढे बदनाम करा, असे काम काही लोकांनी चालविले आहे.   मात्र त्यांच्या या बदनामीचा मतदारांवर काहीही परिणाम हाेत नाही, हे राज्यातील व देशातील निकालांवरून दिसून अाले अाहे.  तालुक्यात ८ पैकी ७ पंचायत समिती निवडून आल्यामुळे फुलंब्री भाजपच्या ताब्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना आपण निवडून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. 
बातम्या आणखी आहेत...