आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: भाजप समर्थक देशभक्तीचे दलाल, तुषार गांधींची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजप आणि त्यांचे समर्थक यांची देशभक्ती खरी नसून ते देशभक्तीचे दलाल आहेत. आमचा विचार चुकीचा असला तरी तो मान्य करा, असा हेका लावला जात आहे. गुरमेहर कौरने जो विषय उपस्थित केला त्यावर चर्चा करण्याऐवजी तिच्यावरच आरोप करून तिला हात जोडायला भाग पाडले जाते, असा आरोप करीत महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी गुरमेहरच्या वादात उडी घेतली. 

औरंगाबादेत फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेसाठी आलेल्या गांधींनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सध्याच्या राजकीय स्थितीवरही तिखट भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या देशात मोठे मंथन सुरू आहे. अशाच मंथनातून क्रांती उद‌्भवते. स्वातंत्र्यानंतर या देशात क्रांती झाली नाही. पण क्रांतीसाठी आवश्यक असलेला असंतोष तयार होत आहे. आमचा विचार चुकीचा असेल पण तो तुम्हाला मान्य करावा लागेल, असा हेका लावला जात आहे. एटीएमच्या रांगा असल्या तरी देशभक्तीचे दाखले द्यायचे, गुरमेहरच्या प्रकरणातही तेच होत आहे. हा प्रत्यक्षात फॅसिझमचा अाहे असेही ते म्हणाले.
 
गुरमेहर प्रकरणाकडे कसे पाहता, या प्रश्नावर ते म्हणाले की, एक मुलगी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलते तेव्हा तिच्यावर खालच्या पातळीवरचे आरोप केले जातात. तिला भंडावून सोडले जाते हात जोडून गावाकडे परतायला भाग पाडले जाते. बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देणारेच तिला गुंगी गुडिया बनायला भाग पाडत आहेत. खरे तर विरोधकांतील महिलांबद्दल गुंगी गुडिया अशी संभावना करणााऱ्या पंतप्रधानांनी पुढे येऊन गुरमेहरच्या बाजूने उभे राहायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. 

भाजपचे यश विचारांवर नाही 
देशात एवढे चित्र विदारक असेल तर भाजपला निवडणुकांमध्ये सातत्याने मिळणारे यश वाढतच अाहे, हे निदर्शनास आणून दिल्यावर गांधी म्हणाले की, भाजपला मिळालेले यश हे त्यांच्या विचारांचे यश नाही, तर दुसरा कोणताच पर्याय नसल्याने लोकांनी केलेले मतदान अाहे. २०१४ मध्येही तेच झाले. विरोधकांचे अपयश हेच भाजपच्या यशाचे खरे कारण असून विरोधकांत एकसुद्धा नेता असा नाही की तो पर्याय म्हणून लोकांना स्वीकारता येईल. 
 
पुढील स्लाइडवर वाचा खादीच्या कॅलेंडरवरून बापूंना वगळणे ही त्याच्या विचारांना हरताळ फासणारी उदाहरणे -तुषार गांधी
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...