आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील पहिले सिंथेटिक टर्फ फुटबॉल मैदान लवकरच अाैरंगाबादेत, खा. खैरे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पश्चिम विभागीय भारतीय क्रीडा प्राधिकरण साई येथे महाराष्ट्रातील पहिले सिंथेटिक टर्फ फुटबॉल मैदान उभारण्यात येणार आहे. देशात चार  मैदानांचा प्रस्ताव मंजूर झाला. यात औरंगाबादचा समावेश आहे. लवकरच याला सुरुवात होईल, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

साईचा १०८ एकर परिसर असून येथे आता फुटबॉलसाठी मंजुरी मिळाली आणि क्रिकेट स्टेडियमचा पाठपुरावा सुरू आहे. क्रिकेटचा जानेवारीमध्ये निर्णय होईल. त्याचप्रमाणे येथे खेळाडूंना राहण्यासाठी निवास व्यवस्थादेखील वाढवण्यात येईल. येथे  स्टेनलेस स्टीलचा जलतरण तलाव, हॉकीचे अॅस्ट्रोटर्फ मैदानाची कामे वेगाने सुरू आहेत. आता येथे फुटबाॅल मैदानाच्या कामाची सुरुवात होईल. औरंगाबाद साईचे सहसंचालक वीरेंद्र भांडारकर चांगले काम करतात. त्यांच्या पाठपुराव्यामुळे साईत सुविधा वाढत आहेत. जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मैदाने आणि सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खैरे म्हणाले.    

साईत स्टील जलतरणिका सप्टेंबरमध्ये : येथील स्टेनलेस स्टील जलतरण तलावाच्या बांधणीचे काम सप्टेंबरमध्ये सुरू होईल. देशातील पहिल्याच स्टीलच्या तलावाला तब्बल १० कोटी खर्च येणार आहे.  ब्राझीलमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ज्या कंपनीने जलतरण तलावांची उभारणी केली, त्याच कंपनीला हे काम देण्यात आले.
 
सुविधांसाठी सात कोटींचा निधी मंजूर
खेलो इंडिया स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर योजनेतून सिंथेटिक टर्फ फुटबॉल मैदान उभारले जाणार आहे. त्यासाठी सात कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीत साई केंद्राचा दोन कोटींचा वाटा असणार आहे. सद्य:स्थितीत मराठवाड्यात एकाही जिल्ह्यात सिंथेटिक टर्फ फुटबॉलचे मैदान नाही.
बातम्या आणखी आहेत...