आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 डिसेंबरपासून राज्यात शेतकऱ्यांचे जेल भरो; कर्जमुक्‍ती हमीभावची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कर्जमुक्ती, हमीभाव आदी मागण्यांसाठी आंदोलने, न्यायालयीन लढा या वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याने डिसेंबरपासून राज्यभरात जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी राज्यस्तरीय किसान मंचाच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील १० लाख शेतकरी तुरुंगात जाण्याचे इच्छापत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार असल्याची माहिती माजी आमदार तथा मंचाचे प्रमुख शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
राज्यभरातील विविध संघटनांच्या नेत्यांच्या या बैठकीत अनेकांनी भूमिका मांडली. स्वातंत्र्यानंतर अनेक सरकारे पाहिली, पण शेतकऱ्यांबाबत एवढा निष्ठुरपणा कोणत्याही सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या वाट्याला आला नाही, अशी परखड टीका त्यांनी केली. दुष्काळ, रोगराई, अतिवृष्टी शेती उत्पादनांचे त्या त्या वेळी कमी झालेले भाव याबाबत काही ना काही मदत वा कर्जमाफीसारखे कमीअधिक प्रमाणात उपाय योजल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान भाजप-सेना सरकारकडून मदत तर नाहीच, पण जबाबदार मंत्रीही शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील बाबींची टिंगल करताना दिसतात. म्हणजेच धर्मांतर, भाषांतर आणि विषयांतर करण्यात सरकार अतिशय पटाईत आहे, अशा शब्दांत आ. जयदेव गायकवाड, विधानसभेचे मा. उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्डे, किशोर माथनकर यांनी सडकून टीका केली. “अब अंधारे जीत लेंगे लोग मेरे गाव के ले मशाले चल पडे है’ हे गीत गाऊन गजानन उर्वरितपान.४
 
सत्ता बदलण्याची ताकद
सत्ता बदलण्यास हस्वातंत्र्य मिळवण्याची ताकद समाजात आहे. न्याय मिळत नसेल तर तो मिळवण्यासाठी सर्वांनी एकसंघ होऊन पुढाकार घेणेच उचित ठरेल.
- मानवेंद्र काचोळे, शेतीतज्ज्ञ.
 
बातम्या आणखी आहेत...