आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधानंतरही भाजपचे भूमिपूजन, शहागंजमधील पटेलांच्या पुतळ्यावरून राजकारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहागंज उद्यानातील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी भाजपच्या वतीने गुरुवारी भूमिपूजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र मनपाच्या सूचनेप्रमाणे पोलिस प्रशासनाने कार्यकर्त्यांना मज्जाव केल्यानंतरही भूमिपूजन करण्यात आले. आमदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांना अटक करून सोडून देण्यात आले.

पूजनाच्या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच कार्यकर्ते जमत होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची वाट पाहून कार्यकते थकले, पण ते आलेच नाही. आमदार अतुल सावे, जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे, जगदीश सिद्ध, प्रीती तोतला, िदलीप थोरात, भागवत कराड, िशरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती. माजी आमदार किशनचंद तनवाणींचे आगमन झाल्यानंतर संस्थान गणपतीचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मात्र सिटी चौक पोलिसांनी कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे सांगत िवरोध दर्शवला. शेवटी पाच लोकांना हार घालण्यासाठी परवानगी दिल्यानंतर नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी नारळ फोडले.

विषय चौथ-याचा
यापूर्वीच मनपाच्या अधिकाऱ्यांनी जुना पुतळा व चौथरा मनपाच्या अधिकाऱ्यांना घेऊन काढण्याचे सांिगतले होते. त्यानुसार आम्ही कशालाच हात न लावता केवळ कामाचे भूमिपूजन केले. जगदीश सिद्ध, नगरसेवक

तोंडावर विरोध करेल
मी कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही. मनपालाही सांिगतले नाही. मला या नेत्यांना काही सांगायचे असल्यास थेट तोंडावर बोलून िवरोध करेन. मनपाकडे निधी नसताना खासदार तरतुदीतून ४० लाखांचा निधी िदला आहे.
चंद्रकांत खैरे, खासदार