आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्तांसाठी 256 कोटी आले; पंचनामे पूर्ण होताच वाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 256 कोटी रुपये प्राप्त झाले असून, पंचनाम्यांचा अहवाल आल्यानंतर ही रक्कम दोन दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची यादी प्रशासनाकडे असल्यामुळे गावोगाव जाऊन धनादेश वाटपाची गरज नाही. पंचनाम्यांचे अहवाल मिळताच 50 टक्क्यांवर नुकसानीचे क्षेत्र, शेतकर्‍यांची संख्या नक्की होईल व मदतीचा आकडा ठरू शकेल.