आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाच घेताना स्टेनोग्राफरला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लघु लेखकाची(स्टेनोग्राफर) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेत बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करून देण्याच्या नावाखाली पाच हजारांची लाच घेताना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा स्टेनोग्राफर राजेंद्र बाबूराव वाघमारे (४९) याला अटक करण्यात आली. ही कारवाई शारदा मंदिर हायस्कूल येथे दुपारी २.३५ वाजता करण्यात आली.
तीन दिवसांपासून टायपिंग परीक्षा सुरू होती. तक्रारदाराने शिवाजीनगरातील स्वामी समर्थ टायपिंग अँड शॉर्टहँड इन्स्टिट्यूटममधून अर्ज भरला. जूनला शारदा मंदिर हायस्कूलमध्ये शॉर्टहँडचा पेपर होता. जूनला प्रवेशपत्र घेण्यासाठी तक्रारदार इन्स्टिट्यूटमध्ये गेला असता वाघमारे तेथे भेटला. परीक्षेवेळी केंद्रावर वेगळी व्यवस्था करण्याचे त्याने आश्वासन दिले. तसेच उत्तीर्ण होण्यासाठी मदत करतो, असेही तो म्हणाला. यासाठी पाच हजारांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या वतीने शुक्रवारी सापळा रचून पाच हजारांची लाच घेताना वाघमारे याला अटक करण्यात आली.