आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यानंतरही मुले पुस्तकांपासून वंचित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अयुब खान यांना उपायुक्तपदी प्रमोशन, कार्यकारी अभियंता बनसोडे यांना मुदतवाढ यासारख्या निर्णयांची अंमलबजावणी काही तासांत करणाऱ्या मनपा प्रशासनाने आपल्या शाळांतील 9 वी 10 वीच्या विद्यार्थ्यांना द्यावयाच्या पुस्तकांच्या फाइलवर अजूनही निर्णय घेतलेला नाही. परिणामी, शाळा सुरू होऊनही या विद्यार्थ्यांना अपुऱ्या जुन्याच पुस्तकांवर अभ्यास करावा लागत आहे.
महापालिका शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून चांगलीच सुधारली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाची दखल सगळीकडे घेतली गेली. त्यांना अभ्यासासाठी लागणाऱ्या सुविधा शाळांनी दिल्याने त्यांनी चांगले यश मिळवले होते. तत्कालीन आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे यांनी लक्ष घातल्याने गेल्या वर्षीपर्यंत शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके साहित्य हातात पडत असे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अभ्यासाला प्रारंभ करता येत असे. यंदा मात्र तसे झालेले नाही. या वर्षी शाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले, पण नववी दहावीच्या एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे आहे त्या जुन्या अपुऱ्या संख्येतील पुस्तकांच्या आधारावरच त्यांचा अभ्यास सुरू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता पुस्तकांबाबतच्या फायलीवर अद्याप मनपा आयुक्तांची सही झालेली नसल्याने विलंब होत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी अयुब खान यांना उपायुक्तपदी प्रमोशन देण्याचा निवृत्तीला आलेले परमेश्वर बनसोडे यांना कार्यकारी अभियंतापदी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या अंमलबजावणीच्या आदेशांवर तत्काळ सह्या करून आजपासून त्यांना नवीन पदेही मिळाली, पण दुसरीकडे पाठ्यपुस्तकांची फाइल मात्र तशीच पडून आहे.
बातम्या आणखी आहेत...