आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sting Of Health : Patients Give 25 Percent Extra Fees

पंचनामा आरोग्याचा : दुबळय़ा कारभारामुळे रुग्णांना 25 पट भुर्दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटी रुग्णालयात वैद्यकीय उपचार आजही किफायतशीर आहेत; पण रुग्णसेवा खिळखिळी झाल्यामुळे रुग्णांना नाइलाजाने धर्मादाय किंवा खासगी रुग्णालयांकडे वळावे लागत आहे. मात्र, धर्मादाय किंवा खासगीत 5 ते 25 पट जास्त शुल्क आकारले जात असल्याने रुग्ण अक्षरश: नागवला जात आहे. दै. ‘दिव्य मराठी’ने शहरातील रुग्णालयांमध्ये आकारल्या जाणार्‍या शुल्काची घाटीतील (एपीएल रुग्णांसाठी) दरांशी तुलना केली तेव्हा हे जळजळीत वास्तव उजेडात आले.


असे आहेत रुग्णालयांचे दर (रुपयांमध्ये)
उपचार घाटी हेडगेवार रुग्णालय माणिक हॉस्पिटल
कन्सल्टेशन 10 100 100
सोनोग्राफी 100 300-500 450
एक्स-रे 75-100 250 250
ईसीजी 50 100 100
सीटी स्कॅन 400 1300-2500 1000
अतिदक्षता (रोज) 200 1800 2000
अपेंडिक्स सर्जरी 1000 15,000-17,500 20,000
गॉल ब्लॅडर सर्जरी 1000 25,000 25,000
मुतखडा 1000 15,000 20,000-25,000
अँजिओग्राफी 3000 (सुविधा नाही) 5500-7500
अँजिओप्लास्टी 3000+स्टेंट - 65,000 च्या पुढे
बायपास सर्जरी 2500 - 1,15,000(पॅकेज)
कॅन्सर शस्त्रक्रिया 500-1000 - 50,000-80,000
मोतीबिंदू 500 7000+लेन्स (सुविधा नाही)