आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बसवर दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मध्यवर्ती बसस्थानकाहून सिडको बसस्थानकाकडे जाणार्‍या शहर बसवर जालना रोडवरील राज पेट्रोल पंपासमोर दगडफेक करण्यात आली. ही घटना रविवारी (1 सप्टेंबर) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. तोंडाला रुमाल बांधून आलेले तीन तरुण दगडफेकीनंतर दुचाकीवरून पसार झाले.

मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवासी घेऊन निघालेली शहर बस (एमएच-20, डी-8322) जालना रोडवरील राज पेट्रोलपंपासमोर आली असता दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन तरुणांनी चालकाला बस थांबवण्याचा इशारा केला. बस थांबल्यानंतर या तरुणांनी बसवर दगडफेक करून पळ काढला. यात बसच्या समोरील काचा फुटल्या. यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली.याप्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावणेतीन वाजेच्या सुमारास बस घेऊन सिडको बसस्थानकाकडे जात होतो. तेव्हा तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी बस थांबवण्यासाठी हात केला. बस थांबवताच दगडफेक करून तिघेही पसार झाले. सय्यद मुमताज, बसचालक

मी सिडकोत जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकापासून बसमध्ये बसलो. बस राज पेट्रोल पंपासमोर येताच अज्ञात तरुणांनी दगडफेक केली. यामुळे आम्ही घाबरून गेलो. सुखदेव माने, प्रवासी