आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महावितरण’वर दगडफेक; उपकरणे जळाल्याने नागरिकांचा संताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संजयनगर (कैलासनगर) येथे सुमारे ४०० घरांतील विद्युत उपकरणे उच्च दाबामुळे जळाली. यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी (२५ नोव्हेंबर) रात्री अकरा वाजता अमरप्रीत चौक येथील महावितरणच्या कार्यालयावर दगडफेक केली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. ‘आमची उपकरणे जळाली. त्याचा पंचनामा करण्यासाठी या’, अशी मागणी करत हे नागरिक कार्यालयावर पोहोचले. पण तेथे कुणीही अभियंता नसल्याने ते संतापले. दगडफेकीची घटना कळताच वरिष्ठ अभियंता आय. जी. बोराडे संजयनगरात पोहोचले. त्यांनी तातडीने पंचनामे सुरू केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.