आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stone Pelting On Police Men, Quarrel Over Parking

PHOTOS: दगडफेक करून पेटवली रिक्षा; नातलग म्हणाले, पोलिस ठाण्यावर बॉम्ब टाकू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 'नोपार्किंग झोन'मध्ये उभी केलेली रिक्षा हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी रिक्षाचालकांचा वाद विकोपाला गेला. यातून काही रिक्षाचालक इतरांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. रिक्षाचालकाने त्याच्या मुलाला रिक्षात बसवून ती पेटवून दिल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन परिसरात घडली. रिक्षाचालक शेख गफ्फार शेख जब्बारला (३५, रा. सिल्कमिल कॉलनी) अटक केली आहे. पोलिसांनीच मुलाला रिक्षाबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

मंगळवारी रेल्वेस्टेशन परिसरातील पार्किंग झोनमध्ये अनेक रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा लावल्या होत्या. मात्र शेख गफ्फारने त्याची रिक्षा (एमएच २० एए ५१५४) मध्येच उभी केली होती. त्यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माणिक भाऊसाहेब चौधरी, सहायक फौजदार खान, हवालदार माधवराव साळुंके त्याला समजावण्यासाठी गेले. परंतु शेख गफ्फारने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान घटनेदरम्यान आणखी एक जण तेथे आला. त्याने शेख गफ्फारने स्वत:ची रिक्षा पेटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेखचा मुलगा त्यात होता. पोलिसांनी शेख गफ्फार त्याच्या साथीदाराला आवर घालत रिक्षातील मुलाला बाहेर काढले. मात्र या घडामोडीत शेखने हवालदार सोळुंके यांच्या हाताला कडकडून चावा घेतला. तसेच रिक्षावर रॉकेल टाकून आग लावली. त्यानंतर शेख गफ्फार त्याचा मित्र तसेच आणखी दोन ते तीन रिक्षाचालकांनी दगडफेक सुरू केली. परिस्थिती हाताबाहरे जात असल्याचे पाहून चौधरी यांनी लगेचच पॉइंटवरील कर्मचारी सुनील चौथमल यांना कंट्रोल रूमशी संपर्क साधून आणखी कर्मचारी मागवण्यास सांगितले. यादरम्यान एका रिक्षाचालकाने चौथमल यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. चारही बाजूने दगड येत असल्याने चौकात पडलेल्या चौथमल यांना कोणीही रुग्णालयात नेण्याची हिंमत करत नव्हते. मात्र, भावाच्या गॅरेजवरील सय्यद फैजल यांना घाटीत दाखल केले. वृत्त कळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह उपायुक्त संदीप आटोळे, वसंत परदेशी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी घाटीत धाव घेऊन चौथमल साळुंके यांची चौकशी केली. पोलिस आयुक्तांनी रेल्वेस्थानक परिसरात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.

जाळपोळ, दगडफेक पूर्वनियोजित ?
पोलिसजेव्हा शेख गफ्फार याला समजावण्यासाठी गेले होते तेव्हा अचानक रिक्षाचालकांकडे रॉकेल आले कसे आणि लगेचच त्याचे साथीदारही तेथे हजर झाले. आणि यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा रिक्षा जाळण्याचा प्रयत्न होत होता त्या वेळी शेख गफ्फारचा मुलगा त्या रिक्षात होता आणि लगेचच पोलिसांवर दगडफेकीला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टींवरून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई
याप्रकरणात पोलिसांची काही चूक आहे का, हे तपासले जाणार आहे. तसेच पोलिसांवर हल्ला करणे ही बाब कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. शेख गफ्फारला अटक केली असून आणखी दोन जण पसार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रिक्षाचालकांना पोलिस आयुक्तांचे समुपदेशन
आयुक्तांनीघटनास्थळी पाहणी करून रिक्षाचालकांचे समुपदेशन केले. ते म्हणाले की, रिक्षाचालकांना जर पोलिसांचा त्रास होत असेल तर त्यांनी स्वत:हून चांगले राहावे, कायद्याचे पालन करावे. बेशिस्तपणे वागू नये. मी येथे १५ दिवसांपर्यंत एकही पोलिस ठेवणार नाही. पार्किंगमध्ये रिक्षा लावण्यासाठी पैसेसुद्धा घेणार नाही. तसेच आम्हाला रिक्षाचालकांविरुद्ध चालान फाडण्याचा छंदही नाही, तुम्ही जर कायद्याचे पालन केले तर आम्ही कोणालाही त्रास देणार नाही.

नातेवाइकांची पोलिसांना शिवीगाळ
सर्वप्रकरणानंतर क्रांती चौक पोलिसांनी रिक्षाचालकाला पोलिस ठाण्यात आणले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असतानाच रिक्षाचालकाचा भाऊ नातेवाईक पोलिस ठाण्यासमोर जमले अन् पोलिस ठाण्यासमोरच मोठमोठ्याने शिवीगाळ सुरू केली. 'सैन्यातील काकाला फोन करून बोलवा आणि पोलिस ठाण्यालाच बॉम्बने उडवून द्या,' अशी आरडाओरड करण्यात आली.
पुढे पाहा संबंधित घटनेची छायाचित्रे....