आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक जागेवरील अतिक्रमण काढण्याने औरंगाबादेत वाहनांवर दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- धार्मिक जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या वादातून अयोध्या नगरात बुधवारी जमावाने सहा वाहनांवर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यात तीन एसटी बसचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर अयोध्या नगरात तणाव निर्माण झाला आहे.

महापालिकेतर्फे शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी महापालिकेने रेल्वेस्थानक ते आरटीओ कार्यालय मार्गावरील अयोध्यानगरात मोर्चा वळविला होता. धार्मिक जागेवरील अतिक्रमण काढू नये, अशा स्थानिकांच्या मागणीकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे जमावाने वाहनावर तुफान दगडफेक केली. त्यात तीन एसटीसह सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.