आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर वेठीस धरणाऱ्या तेरा टवाळखोरांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगपुरा चौकात टपरी उलथवून दुकानदारांना मारहाण करून पोलिस प्रशासनासह शहराला वेठीस धरू पाहणाऱ्या तेरा टवाळखोरांना क्रांती चौक पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. यातील दोघे जण अल्पवयीन आहेत. शनिवारी दुपारी अडीचच्या दरम्यान स. भु. महाविद्यालयासमोर दोन गटांत हाणामारी झाली होती. जखमी झालेल्या सिल्लेखान्यातील तरुणांनी आपल्या मित्रांना बोलवून घेतल्यानंतर या गटाने रस्त्यावरील पानटपरी चालकांना मारहाण करून दगडफेक केली होती. तसेच पानटपऱ्या उलथवल्या होत्या. पोलिसांनी दोन्ही गटांतील युवराजसिंग झालार (१८, रा.धावणी मोहल्ला), अक्षय सिंदीवाल (२२, रा.जुनाबाजार), योगेश कंडेरा (१८, रा. फकीरवाडी), सोमेश रिडलॉन (१९, रा. दिवाणदेवडी) आणखी दोन अल्पवयीन मुले, सिल्लेखान्यातील शाहरुख चाँद कुरेशी, शारुख फारुख कुरेशी, इरफान कुरेशी, कलमी अब्दुल रहिम कुरेशी, सोहेल कुरेशी, वसीम कुरेशी एक अल्पवयीन मुलगा अशा सुमारे १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिसाळ करत आहेत.

महाविद्यालयात आले म्हणून भांडण
सिल्लेखान्यातीलकाही तरुणांना शनिवारी दुपारी सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या आवारात तुम्ही का आले, असे दुसऱ्या गटाने विचारले. यातूनच वादाची ठिणगी पडून त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.
बातम्या आणखी आहेत...