आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला रोखूया राष्ट्रध्वजाचा अवमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. अत्यंत व्यापक अशा स्वातंत्र्यलढ्यानंतर आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला. तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन म्हणून, तर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून सार्वजनिकरीत्या राष्ट्रध्वज फडकवला जातो. महाराष्ट्रात या दोन दिवसांव्यतिरिक्त १ मे रोजी, तर मराठवाड्यात १७ सप्टेंबर रोजी ध्वजवंदन होते. देशभरात चार वेळेस ध्वजवंदन

करण्याचा मान मिळवणारा मराठवाडा हा एकमेव विभाग आहे. त्या दृष्टीने तिरंग्याबाबत मराठवाड्याची जबाबदारीही मोठी आहे. राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या तिरंग्याचा मान राखणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, परंतु माहितीच्या अभावी राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तो टाळण्यासाठी लोककल्याण बहुद्देशीय क्रीडा सांस्कृतिक शिक्षण संस्था २००७ पासून राज्यभरात जनजागरण मोहीम राबवत आहे.

१६ हजारलोकांना मार्गदर्शन
लोककल्याण बहुद्देशीय क्रीडा सांस्कृतिक शिक्षण संस्था आणि केंद्राच्या खेल मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने २००७ पासून राष्ट्रध्वज संहिता जनजागरण महाअभियान राबवले जात आहे. पीईएस संस्थेच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापक महादेव कचरू उबाळे हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते व त्यांचे सहकारी ठिकठिकाणी कार्यशाळा घेत आहेत. आतापर्यंत ११३ कार्यशाळांमधून १६ हजार नागरिकांना त्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. यात शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, खासगी कर्मचारी, पोलिस दल आदींचा समावेश आहे.

अडीच तासांची कार्यशाळा
या उपक्रमाअंतर्गत प्रा. उबाळे अडीच तासांची कार्यशाळा घेतात. यात ते थिअरीसह प्रात्यक्षिकाद्वारे राष्ट्रध्वजाचे महत्त्व, त्यास हाताळण्याचे नियम, त्याचा अवमान टाळणे याबाबत प्रशिक्षण देतात. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या आधी ते कामाला लागतात. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाडा, पुणे, सातारा, सांगली, नागपूर या प्रमुख शहरांत कार्यशाळा झाल्या आहेत. राष्ट्रध्वजाची माहिती देणारी एक किट त्यांच्याकडे तयार आहे. निमंत्रण मिळताच ते रवाना होतात. हा उपक्रम ते नि:शुल्क राबवत आहेत, हे विशेष. देशात अशा प्रकारचा हा एकमेव कार्यक्रम आहे. गरजेनुसार ते सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करतात व उपस्थितांना
मनोरंजनाबरोबर माहितीही देतात.
प्रजासत्ताकदिनी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये झेंडावंदन होते. अनेकदा जय्यत तयारी करूनही ऐनवेळी चुका होतात आणि तिरंग्याचा अवमान होतो. बहुतांश वेळा नियमांची माहिती नसल्याने हे प्रकार घडतात. ते टाळण्यासाठी डीबी स्टार आजपासून जनजागरण अभियान सुरू करत आहे. २००७ पासून राष्ट्रध्वज संहिता जनजागरण अभियान राबवणाऱ्या लोककल्याण बहुद्देशीय क्रीडा सांस्कृतिक शिक्षण संस्थेच्या मदतीने हा उपक्रम राबवला जाणार आहे.

पाच दिवस अभियान
आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी "डीबी स्टार' आणि लोककल्याण बहुद्देशीय क्रीडा सांस्कृतिक शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा जनजागरण अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत २० ते २५ जानेवारीदरम्यान विविध शाळांमध्ये तिरंग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रा. उबाळे हे कार्यशाळा घेणार आहेत.

जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळेल
- आपल्या हातून अनेकदा राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. नियमांची माहिती नसल्यामुळे हे प्रकार घडतात. अशा चुका टाळण्यासाठीच आम्ही २००७ पासून राष्ट्रध्वज संहिता जनजागरण महाअभियान राबवत आहोत. "डीबी स्टार'मुळे आम्हाला अधिकाधिक शाळांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. यातून जास्तीत जास्त शालेय मुलांना व विविध ठिकाणच्या नागरिकांना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची सखोल अशी माहिती मिळेल.
-प्रा. महादेव उबाळे, अध्यक्ष, लोककल्याण बहुद्देशीय क्रीडा सांस्कृतिक शिक्षण संस्था
पुढील स्‍लाइडवर वाचा, प्रजासत्ताकदिनी काय करावे, काय करू नये...