आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झीरो’ पोलिसांची गुंडगिरी थांबवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रत्येक पोलिस ठाण्यात सोयीसाठी कार्यरत असलेल्या झीरो पोलिसांनी अवैध मटका, दारू, वाळूच्या माध्यमातून मिळणाऱ्या हप्त्यातून दादागिरी चालवली असून त्यांना तातडीने रोखण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा उपाध्यक्ष अमित वाहूळ यांनी हे निवेदन दिले आहे. प्रत्येक ठाण्यातील झीरो पोलिस दारू, मटका, रेती यासारख्या अवैध धंद्यातून मिळणारा पैसा गोळा करतात. तो ठाण्याच्या प्रमुखांपर्यंत पोहोचते करतात. त्याच जोरावर जनतेवर दादागिरी गुंडगिरी करतात. पोलिस ठाण्यामध्ये काही गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणूनही तेच प्रयत्न करतात, अनेक प्रकरणांत मध्यस्थी करतात, असे निवेदनात नमूद केले असून त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांचा वरदहस्त लाभल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे झीरो पोलिसांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

झीरो पोलिस म्हणजे काय?
पोलिसठाणे प्रमुखांच्या सोयीसाठी असे पोलिस नियुक्त केले जातात. त्यांच्याकडे अन्य कोणतीही जबाबदारी नसते, परंतु ते कोणत्याही बीटमध्ये घुसून कारवाई करू शकतात. कोणतीही जबाबदारी नाही, परंतु सर्वच कामे जे करू शकतात त्यांना झीरो पोलिस म्हणतात.