आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stope Corruption : CIDCO Director Bhatia Ordered To Officers

दोन महिन्यांत भ्रष्टाचार थांबवा; अन्यथा जेल : सिडको प्रमुख्‍ा भाटिया यांची तंबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडको 21 वर्षांपूर्वी देशात अव्वल स्थानी होते. अधिका-यांना एक्स्पर्ट म्हणून देशात बोलावणे होते. आज मात्र व्यावसायिकता लयास गेली. अनागोंदी कारभार झाला. त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेला तडा गेला. आता भ्रष्टाचारमुक्त प्रशासनावर भर राहील. कर्मचा-यांनाही तज्ज्ञ म्हणून बाहेर जाण्याची तयारी ठेवावी लागेल.
सगळीकडे मित्र, भ्रष्टांची माहिती मिळते


औरंगाबाद झालरक्षेत्राचा आराखड्यात सिडकोने धनदांडग्यांना झुकते माप दिले. तो वादात सापडला. मग मुख्यमंत्र्यांनी नगररचना विभागास तो बनवण्याचे सांगितले. प्रतिमा सुधारण्यासाठी नेटाने कामाला लागावे लागेल. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद सगळीकडे भ्रष्टाचार आहे. पण ‘नो करप्शन अ‍ॅट ऑल’. औरंगाबाद ते मुंबईपर्यंत सगळीकडे माझे मित्र आहेत. कोण भ्रष्टाचार करतो याची इत्थंभूत माहिती मिळते. खालपासून वरपर्यंत मला बदल पाहिजे. कारवाई करण्यास भाग पाडू नका. समस्या असतील तर त्या सोडवण्यावर पुरेपूर भर दिला जाईल.


कामावर निष्ठा ठेवा, आनंदी राहाल
गुणवत्तेची जाणीव झाली की अशक्य काहीच नाही

याआधी मी राज्याचा आयकर आयुक्त होतो. कारभार हाती घेण्यापूर्वी 23 हजार कोटींचा महसूल मिळत होता. पदावरून जाताना तो 66 हजार कोटींपर्यंत गेला होता. कर्मचारी तेच होते महसूल देणारेही येथीलच होते. योग्य गुणवत्तेची जाणीव झाल्यास कुठलेच काम अशक्य नाही. त्यामुळे कामावर सदैव निष्ठा ठेवा. भ्रष्टाचारावर निष्ठा ठेवाल तर नरकात जाल. जीवनातील आनंद गमावून बसाल. कौटुंबिक सुखापासून वंचित व्हाल. त्यामुळे पुन्हा एकदा विश्वासास पात्र ठरा.


कर्मचा-यांना प्रशिक्षण देणार
माळी कामगारापासून वास्तुविशारद व अभियंत्यापर्यंत सर्वांना सिडकोच्या खर्चाने चांगल्या संस्थेत प्रशिक्षणाला पाठवलेजाईल. उड्डाणपूल, रेल्वे या विषयांत तज्ज्ञ तयार झाल्यास सिडकोला मानाचा शिरपेच मिळेल.