आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत विमा, लकी ड्रॉचे आमिष दाखवणे थांबवा; विमा कंपनीला निर्देश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लकी ड्रॉ, मोफत पॉलिसी अशा शब्दांना बळी पडू नये व फोन कॉलवरील माहितीवर विश्वास ठेवू नये, अशा आशयाची जाहिरात वृत्तपत्रांत द्या, असे निर्देश जिल्हा ग्राहक मंचाने रिलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. ग्राहकास 12 टक्के व्याजासह रक्कम देण्यासह 5 हजारांची भरपाई देण्याचे आदेशही कंपनीला दिले आहेत.
जामगावच्या (ता. गंगापूर) नितीन पगारे यांना 15 फेब्रुवारी 2011 रोजी ‘तुमचा क्रमांक लकी ड्रॉमध्ये आला असून, एक लाखाची मोफत विमा पॉलिसी मिळाली आहे’, असा फोन आला. त्यानंतर कंपनीने दहा वर्षांच्या पॉलिसीसाठी 5 वर्षेच प्रीमियम भरावा लागेल, असे त्यांना सांगितले. 11,256 रुपये वार्षिक हप्त्याची पॉलिसी त्यांनी काढली. दहा वर्षे हप्ता भरावा लागणार असून, जमा रक्कमच मिळणार असल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले होते.