आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stores Open In Parking, Municipal Corporation Issue Notice To 15 Pearsons

पार्किंगमध्ये दुकाने थाटली; १५ जणांना मनपाची नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - व्यावसायिक संकुलातील पार्किंग मोकळे करण्याची मोहीम मनपाने हाती घेतली असून निराला बाजारमधील दोन संकुलातील पार्किंगमधील दुकाने पाडण्यात आली. मनपाने आतापर्यंत १५ जणांना नोटिसाही बजावल्या आहेत.

नागरिक रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. मात्र, व्यापारी संकुलातील पार्किंगमध्ये दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने पुढाकार घेऊन गेल्या आठवड्यात निराला बाजारमधील दोन संकुलांतील पार्किंगच्या जागेतील गाळे हटवले. शहरातील विविध भागांतील १५ जणांची यादी तयार करून त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

जालना रोडवरील अतिक्रमणे बाकी : रस्त्यांचीरुंदी वाढवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने मनपाला जालना रोडवरील अतिक्रमणे काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार मनपाच्या पथकाने कारवाईही सुरू केली होती. मात्र, गोदावरी खोरे, आकाशवाणी आणि एसएफएस हायस्कूलने १५ दिवसांचा अवधी मागून स्वत:हून अतिक्रमण काढणार असल्याचे सांगितले होते. मात्र, दोन महिने उलटूनही ही अतिक्रमणे काढली गेली नाहीत.