आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसही भारावले बाईंच्या ‘फिलॉसॉफी’ने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अंजनी सिद्धानंद गुलवाडी. वय वर्षे 80. देवगिरी कॉलनीतील आपल्या प्रशस्त बंगल्यात त्या अनेक वर्षांपासून एकट्या राहतात. हे एकटेपण त्यांच्यावर कुणी लादलेले नाही तर ते त्यांनी आपणहून जपलेले आहे. आश्रम व्यवस्थेतील वानप्रस्थ आश्रमासारखे!
बाईंनी आपल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या बंगल्यातील पहिला मजला मेघालयातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीला दान केला, तर दुसरा मजलाही चिन्मय मिशनला दान केला आहे. माझे घर मुलाबाळांनी भरलेले असावे आणि समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने हा बंगला गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देऊन टाकला, असे त्यांनी सांगितले. बाई एवढय़ावरच थांबल्या नाहीत तर या दानशूर वृद्ध महिलेने मरणोत्तर देह, डोळेसुद्धा दान करून टाकले आहेत.
अंजनीबाई शारदा विद्यालयात शिक्षिका होत्या. 18 वर्षे त्यांनी विद्यादानाचे काम केले. वयपरत्वे निवृत्त झाल्या. त्यांना दोन मुलं. दोघेही डॉक्टर. मोठा डॉ. हेमंत परभणीत स्थायिक झाला तर धाकटा डॉ. जयंत सिडनीत (ऑस्ट्रेलिया). मुलं, सुना, नातवंडे..सर्व आहेत. मोठा डॉ. हेमंत महाविद्यालयीन जीवनात चांगला क्रिकेटपटू म्हणून गाजलेला. त्यांचे पती सिद्धानंद हे महाराष्ट्र अकाउं्टस अँड फायनान्स सर्व्हिसेसमध्ये नोकरीला होते. ते दिवंगत झाल्यापासून अंजनी या एकट्याच बंगल्यात राहतात. मुलांनी बरोबर घेऊन जाण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले, पण या बाई आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. नवर्‍याने बांधलेल्या वास्तूत अख्खे जीवन गेले, आता दुसरीकडे करमतच नाही, असे त्या म्हणतात.
पोलिसही भारावले बाईंच्या ‘फिलॉसॉफी’ने - त्यांच्या बंगल्यासमोर टेम्पो उभा राहत होता. त्यामुळे आत कोणीही नाही, असे समजून मुलं बंगल्यात दगडं टाकीत. त्याने बाई त्रस्त होत्या. त्यांनी ही बाब डॉ. रश्मी बोरीकर यांना सांगितली. बोरीकरांनी पोलिस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांना माहिती दिली. निरीक्षक कुलकर्णी सहकार्‍यांसह बाईंच्या घरी गेले. टेम्पोचालकाला हाकलून लावले. त्यांनी बाईंची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत खबरदारी म्हणून गेटवर डायरी ठेवली आहे. रोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी पोलिसांची तेथे चक्कर असते. तसेच रात्रीही घराजवऴून गस्त सुरू केली आहे. पोलिसांच्या या कामाचे बाईंना खूप कौतुक आहे.