आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी FOCUS : हवामान बदलामुळे मध्यम वर्ग अडचणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हवामानातील बदल जगभरातील मध्यम वर्गासाठी नुकसानीचे ठरत आहेत. स्वित्झर्लंडच्या यूबीएस या वित्तीय संस्थेच्या अहवालानुसार, हवामानातील बदलामुळे १९८० ते २०१४ या काळात जगातील मध्यमवर्गाचे १.५ ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक उष्ण ठरलेल्या २०१५ च्या पहिल्या सहामाहीत ३२ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

झुरिच येथे हवामान बदल
जागतिक मध्यमवर्गासाठी जोखीम या नावाने जारी करण्यात आलेल्या या अहवालानुसार, हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गाला बसला आहे. आगामी काळातही याच वर्गाला नुकसान सहन करावे लागणार आहे.

टोकियो, शांघायमध्ये खर्चात कपात
यूबीएसने केलेल्या विश्लेषणानुसार जगात लॉस एंजलिस, टोकियो आणि शांघाय या शहरांतील मध्यमवर्गावर हवामान बदल सर्वाधिक जोखमीचे आहेत. या शहरातील मध्यमवर्गाच्या खर्चाच्या शैलीत लक्षणीय बदल दिसून आला. राष्ट्रीय सरासरीपेक्षा या शहरातील मध्यम वर्ग घरांसाठी ०.६ ते ०.८ टक्के जास्त खर्च करतात असे आढळून आले आहे, तर अमेरिकेतील अतिजोखीम असणाऱ्या शहरांतील मध्यमवर्गीय कमी जोखीम असणाऱ्या शहरांतील लोकांपेक्षा वार्षिक सरासरी ८०० ते १६०० डॉलर घरावर खर्च करतात. त्यांचा लक्झरी, मनोरंजन आणि टिकाऊ वस्तूंवरील खर्च लक्षणीय प्रमाणात घटला आहे.

जीवघेणे तापमान
यूबीएसच्या संशोधनानुसार, जर तापमान ३० अंश सेल्सियसच्या वर राहिले तर मृत्युदरात वाढ होते. गेल्या वर्षी २०१५ मध्ये यूबीएसने विश्लेषणासाठी निवडलेल्या २१५ पैकी २५ टक्के शहरांतील सरासरी वार्षिक तापमान २० अंश सेल्सियसच्या वर होते.

भारत, चीनमध्ये जोखीम
अमेरिकेसारख्या अतिविकसित देशांत ३२ नैसर्गिक आपत्तींतील नुकसान विमाविरहित असते. विकसनशील देशांत हे प्रमाण जास्त आहे. भारत आणि चीनसारख्या देशातील मध्यम वर्ग तर अशा विम्यापासून दूरच असतो. भारतात अशा विम्याचे प्रमाण ०.०७ टक्के, तर चीनमध्ये ०.१२ टक्के आहे.

हवामानातील बदल जगातील सर्वच लोकांसाठी वरचेवर अधिकाधिक त्रासदायक ठरणार आहे.
कॅरोलिन अॅन्स्टे, एमडी, यूबीएस.

जगातील मध्यम वर्ग राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हवामान बदलात हा कळीचा मुद्दा राहील.
पॉल डॉनोव्हॅन, अर्थतज्ज्ञ, यूबीएस बँक.