आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात कुटुंबांत ३० पारशी बांधव, जगभराप्रमाणे औरंगाबादेतही घटली संख्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जग आणि भारताची लोकसंख्या वाढत असताना पारशी समाजाची लोकसंख्या मात्र कमालीची घटत आहे. औरंगाबादेत पारसी समाजाची केवळ सहा कुटुंबे असून एकूण समाज बांधवांची संख्या अवघी ३० ते ३२ आहे. कधीकाळी ५० ते ६० पर्यंत असणारी ही संख्या कामानिमित्त, लग्नामुळे किंवा शिक्षणासाठी येथून बाहेर पडली ती परतलीच नाही. खऱ्या अर्थाने बोटांवर मोजण्याएवढी संख्या असतानाही हा समाज आपले वेगळेपण जपून आहे.

भारतातील सर्व धर्मांतील लोकांची लोकसंख्या स्वातंत्र्योत्तर काळात मोठ्या प्रमाणात वाढत असताना पारशी समाजाची संख्या घटत गेली. हा समाज इराणमधील झोरोस्ट्रियनच्या एका गटातून भारतात दहाव्या शतकात स्थलांतरित झाला. दादाभाई नौरोजी, मादाम भिकाजी कामा, टाटा, गोदरेज, वाडिया ही उद्योगपती घराणी, अणुतज्ञ होमी भाभा, आवाबाई वाडिया ही नावे भारतातातील या अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करतात. औरंगाबादेतही हा समाज बोटावर मोजण्याएवढा असून ही संख्या सतत घटतच चालली आहे.

९०वर्षांचा इतिहास: अौरंगाबादेतपारशी समाज साधारणपणे १९२० ते १९३० च्या काळात व्यवसायाच्या शोधात आला. यात बुजूर्ग नाव म्हणजे प्रिंटर यांचे. बाबा पेट्रोलपंप चौकाची आेळख असणारे प्रिंट्रव्हल हॉटेल, एन.ए.प्रिंटर पेट्रोलपंप आणि एक बर्फाची फॅक्टरी त्यांचीच. एबीसी कॉॅम्पलेक्समधील प्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. पेशोतन जालनावाला १९८१ मध्ये शहरात आले आणि इथलेच झाले. त्यांचे उद्योजक बंधु होरमस जालनावला नंदादीप कॉलनीत राहतात. मिल कॉर्नरवरील पूर्वीचे नरीमन सेल्सचे नरीमन कुटूंबही पारशीच होते. हा व्यवसाय बंद करून ते पुण्यात स्थायिक झाले. तर त्यांचेच भाऊबंद सराफ्यात याच व्यवसायात आहेत. जुना बाझारमधील औषधी आणि मेडीकल साहित्याच्या व्यवसायातील अग्रगन्य नाव बबन नानाभाईही शहरात या समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. समाजाचे ज्येष्ठ आणि जाणकार सदस्य म्हणून त्यांच्याकडे बघीतले जाते. या समाजातील बाब फरजन यांनी कधी काळी राजकारणात स्वत:चा ठसा उमटवला. जिल्ला हॉस्पीटलचे डॉ. पर्सी जिल्ला मूळ हैदराबादचे. एमबीबीसाठी ते शहरात आले आणि डॉ. मंजू यांच्याशी विवाहबद्ध झाले. या समाजातील मरोलिया कुटूंब जालन्यात स्थायिक झाले. अगदी १५ ते २० वर्षांपूर्वी ही संख्या ५० ते ६० च्या घरात होती. अधून मधून हे सदस्य भेटायचे. गेट टुगेदर करायचे. मात्र, कामानिमीत्त, विवाहामुळे काही सदस्य शहराबाहेर गेले. ही संख्या कमी होत गेली. ही संख्या घटत असतांना नताशा झरीन विवाह होऊन वर्षांपासून शहरात आल्या. सीआरटी या स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अन्य पारशी बांधवांप्रमाणे आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. पारशी समाज आग, सूर्याचे पूजक आहे. औरंगाबादेत फायर टेंपल म्हणजेच आग्यारी नाही. जालन्यात हे मंदीर आहे.

पारशींची संख्या कमी होतेय
जगातीलपारशी लोकसंख्या एक लाख १० हजार आहे. १९४१ च्या जनगणनेत भारतातील पारशींची संख्या लाख ४१ हजार इतकी होती. १९८१ मध्ये ती ७१,६३० होती. २००१ मध्ये ही संख्या घटून ६९,६०१ तर २०११ मध्ये ५९,२६४ झाली. २०१६ मध्ये ही संख्या ५७,२६४ झाली आहे. दर दहा वर्षात ही संख्या १२ टक्क्यांनी घटत आहे. तर भारताची लोकसंख्या दर दशकात २१ टक्क्यांनी वाढत अाहे. आणखी १० वर्षात ही संख्या २३ हजाराच्याखाली येण्याची शक्यता आहे. पारशी महिलांची संख्या २१ टक्क्यांनी दराने तर पुरूषांची १८ टक्क्यांनी घटत आहे.

जियो पारशी मोहीम
देशातीलपारशी समाजाची संख्या वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्यावतीने २०१३ मध्ये जियो पारशी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यानुसार मुलाल जन्म देण्याची इच्छा असलेल्या परंतूू मूल होत नसलेल्या जोडप्यांना आयव्हीएफ उपचारांसाठी आर्थिक सहाय केले जाते. याचा फायदा दिसत आहे. यात नाव नोंदवलेल्या ७१ जोडप्यांना एक मूल झाले.

यामुळे घटला समाज
- {१०पैकी महिला तर पैकी पुरुष वयाच्या पन्नाशीपर्यंत अविवाहित राहतात.
- २०१३ मध्ये देशात ७३५ पारशांचा मृत्यू झाला. तर १७४ जणांचा जन्म झाला.
- पारशी समाजातील ३८ टक्के तरुण-तरुणी आंतरजातीय विवाह करतात.

दिवसभर सेलिब्रेशन
पतेतीनिमित्तबुधवारी सकाळी चविष्ट शेवयांचा नाश्ता होईल. औरंगाबादेत अग्यारी नाही. यामुळे घरातच पूजा करू. दुपारी पंचपक्वानांची मेजवानी असेल. संध्याकाळी समाजबांधवांच्या भेटीगाठी होतील. -नताशा झरीन

चांगले आयुष्य जगतात
पारशीसमाजचांगले, क्वालिटी लाइफ जगण्यावर भर देता. चांगले विचार, चांगले आचार आणि चांगली वाणी ही त्यांच्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. -डॉ. मंजू जिल्ला
बातम्या आणखी आहेत...