आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"त्याने' अडीच लाखांची रक्कम केली परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बँकेच्या अकाउंटमध्ये चुकून लाख ६५ हजार ५०० रुपये जमा झाले. पण ते पैसे आपले नसल्याचे कळताच एका प्रामाणिक तरुणाने ही बाब बँकेच्या लक्षात आणून दिली आणि आपल्या अकाउंटवर आलेले पैसे परत केले. आजच्या जमान्यात सागर दत्तात्रय गोगे यांच्यासारखे लोकही असल्याचा सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया बँक अधिकाऱ्याने दिली.

सागर गोगे (४०, सिडको एन १) यांच्या खात्यावर २७ मार्च २०१४ मध्ये लाख ६५ हजार ५०० रुपये जमा झाले होते. पण त्यांनी तसे एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकाच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर बँकेने ही रक्कम गोगे यांच्या अकाउंटमध्ये ‘होल्ड’ करून ठेवली. सहा महिन्यांनंतर बँकेने परत गोगे यांच्याशी संपर्क साधून ही रक्कम तुमचीच आहे तुम्ही काढू शकता असा मेसेज त्यांना पाठवला. मात्र आपले पैसे नसताना ते घ्यायचे कसे हा विचार केला आणि त्यांनी याचा पाठपुरावा करण्यासाठी बँकेशी मुंबईपर्यंत पाठपुरावा केला.

चुकून पैसे जमा
सेंट्रलाइज क्लिअरिंग प्रोसेसिंग सेंटरच्या’ माध्यमातून चुकीने हे पैसे गोगे यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले असल्याचे निदर्शनास आले. जुलै महिन्यात गोगे यांना बँकेने बोलावून आम्ही चौकशी केली असून चुकून तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे सांगितले.