आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण भारताचा शहेनशहा, समाधी मात्र मातीची; वाचा औरंगजेब संदर्भातील Unknown Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद – औरंगजेब. भारतीय उपमहाद्वीपांवर 50 वर्षांपेक्षा अधिक काळ राज्‍य करणारा शहनशाह. भारताच नव्‍हे तर संपूर्ण आशिया खंडात एकाही राजाला त्‍याच्‍या पूर्वी आणि नंतर एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर असे दीर्घकाळ राज्‍य करता आले नाही. औरंगजेबने जवळपास पन्‍नास वर्षांहून अधिक वर्ष शासन केले. ‘मुघल-ए-आझम’ अकबर नंतर त्‍यानेच भारतावर अधिक काळ राज्‍य केले. दक्षिण भारतावर साम्राज्‍य स्‍थापीत करण्‍यातच त्‍याचा मृत्‍यू झाला. औरंगजेबाच्‍या कार्यकाळात मुघल शासन मोठ्या प्रमाणावर विस्‍तारले होते. तत्‍कालीन वेळी सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत शक्‍तीशाली शासक म्‍हणून त्‍याची ओळख निर्माण झाली होती. त्‍याने जगाच्‍या एक चतुर्थांश लोकांवर राज्‍य केले. त्‍याच्‍या प्रजेची संख्‍या सुमारे 15 कोटी होती. पण, आता भारत, पाकिस्‍तान, बांगलादेश, अफगाणीस्‍थान अशा प्रदेशावर एकहाती दीर्घकाळ सत्‍ता गाजवणा-या एवढ्या मोठ्या राजाची समाधी मातीची आहे. त्‍यावर साधे छतही नाही तसे का ? व्‍यक्‍तिगत जीवनात तो कसा होता? याची माहिती खास दिव्‍यमराठीडॉटकॉमच्‍या वाचकांसाठी...
पुढील स्‍लाइडवर वाचा औरंगजेबाची समाधी मातीचीच का ....?