आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्‍ट महाप्रलयाची: औषधी आणण्यासाठी गेला अन् हॉटेल कोसळले...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मधुमेहाने आजारी वडिलांची औषधी आणण्यासाठी रेणुकादास हॉटेलात गेले. याच दरम्यान हॉटेल कोसळले आणि ते बेपत्ता झाले. ही हृदय हेलावणारी घटना गौरीकुंड येथे घडली. कुटुंबातील कर्ता मुलगा सापडत नसल्याने परभणी येथील देशपांडे कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. चारधामसाठी गेलेला हा परिवार सुखरूप परत यावा यासाठी परभणी येथील मुस्लिम बांधवांनी गुरुवारी मशिदीत प्रार्थना केली आहे. देशपांडे यांचे मेहुणे गजानन बामणीकर शुक्रवारी सकाळी विमानाने उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत.


परभणी येथील माधवराव देशपांडे, त्यांची पत्नी मालती, मुलगा रेणुकादास, सून मनीषा, नातवंडे विवेक आणि श्रावणी असे सहा जण पाच जूनला परभणी येथील अंबिका यात्रा कंपनीने चारधामसाठी गेले. ढगफुटी झाली त्यादिवशी देशपांडे कुटुंबीय गौरीकुंडातील एका हॉटेलात उतरले. महापूर आल्याने देशपांडे कुटुंब हॉटेलातून बाहेर पडले; परंतु माधवराव यांची हॉटेलातच राहिलेली औषधी आणण्यासाठी रेणुकादास गेले. याच दरम्यान हॉटेल कोसळले आणि रेणुकादास बेपत्ता झाले.


सुनेवर जबाबदारी
माधवराव मधुमेहाचे रुग्ण आहेत, तर त्यांचा नऊ वर्षांचा नातू विवेक हा तापाने फणफणत आहे. अशा परिस्थितीत सर्व कुटुंबाची जबाबदारी आता रेणुकादास यांच्या पत्नी मनीषा यांच्यावर पडली आहे.


ट्रॅव्हल्स कंपनीचे हात वर
देशपांडे कुटुंब ज्या अंबिका यात्रा कंपनीच्या बसने चारधामसाठी गेले होते, त्यांच्याशी संपर्क साधून देशपांडे कुटुंबीयांविषयी चौकशी केली. मात्र, यात्रा कंपनीचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असून तुम्हीच त्यांचा शोध घ्या, असे म्हणत आहेत.
गजानन बामणीकर, देशपांडे यांचे मेहुणे