आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीर्थपुरी - मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने आठवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात रविवारी घडली. महेश संतोष जाधव असे मृत बालकाचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तीर्थपुरी-अंबड रस्ता रोखून धरला.

शाळेला सुटी असल्याने येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारा महेश संतोष जाधव (८) हा जळतण आणण्यासाठी गावालगत असलेल्या जायकवाडी वसाहत येथे गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही महेश परत न आल्याने त्याच्या आईने शोधाशोध केली. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास महेशचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समजताच ग्रामस्थांनी गर्दी केली. दुसऱ्या भागातून येथे ५०-६० मोकाट कुत्रे सोडण्यात आले आहेत. त्यांच्या उपद्रवामुळे ग्रामस्थ हैराण होते. त्यातच हा प्रकार घडल्याने तीर्थपुरी ग्रामस्थांनी तीर्थपुरी-अंबड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. मोकाट कुत्रे या भागात कुणी आणून सोडले आहेत, याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार राजेश टोपे यांनी प्रशासनाकडे केली आहे.