आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Strike News In Marathi, Strike For Lbt Issue At Aurangabad, Divya Marathi

30 कोटींचे व्यवहार ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात शुक्रवारी व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंदमुळे शहरातील 30 कोटींची उलाढाल ठप्प झाली. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा महासंघाने केला. शनिवारी झालेल्या मुंबईतील आंदोलनासाठी शहरातून जवळपास 2 हजार व्यापारी गेल्याचे सांगण्यात आले.

एलबीटीविरोधात शुक्रवारी शहरातील सर्व सराफा व्यापार्‍यांची दुकाने बंद होती. गुलमंडी, निराला बाजार, सिडको, टीव्ही सेंटर व जालना रोडवरील दुकानेही बंद ठेवण्यात आली. कापड बाजारासह किराणा दुकानेदेखील बंद असल्यामुळे सामान्यांची अडचण झाली. शहरातील खाद्यतेल व्यापार्‍यांनीदेखील दुकाने बंद ठेवल्याची माहिती जिल्हा खाद्यतेल संघाचे अध्यक्ष कचरू वेळुंजकर यांनी दिली. मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, पानदरिबा येथे लोकांची फारशी गर्दी नव्हती. सायंकाळी 6 वाजेनंतर काही भागांत व्यापार्‍यांनी दुकाने उघडली होती.

असहकाराचा फटका मनपाला बसणार: व्यापारी महासंघाच्या मुंबईतील मेळाव्यात 28 फेब्रुवारीपर्यंत एलबीटीबाबत निर्णय न झाल्यास केवळ दहा टक्के एलबीटी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापार्‍यांचे असहकार आंदोलन सुरू झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका मनपाच्या अर्थकारणाला बसेल. गेल्या वर्षी एलबीटीमधून शहराला 134 कोटी रुपयांचे उत्पन मिळाले होते. या वर्षी 200 कोटींचे लक्ष्य आहे.

सर्वच दुकाने बंद
बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व व्यापार्‍यांनी शुक्रवारी दुकाने बंद ठेवली होती. राज्यातील 26 महापालिकांचे व्यापारी या मुंबईतील मेळाव्यात सहभागी झाले. मनोज राठी, जनरल सेक्रेटरी, जिल्हा व्यापारी महासंघ.

10 टक्के एलबीटी देणार
औरंगाबादमधून 2 हजार व्यापारी मुंबईला गेले होते. बंदमुळे 30 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. एलबीटी रद्द न झाल्यास 28 फेब्रुवारीपासून केवळ 10 टक्के एलबीटी देऊ. प्रफुल्ल मालाणी, माजी जिल्हाध्यक्ष, व्यापारी महासंघ.