आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या कायगावात स्ट्रॉबेरीची लागवड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामगाव - महाबळेश्वर येथे पिकणारी स्ट्रॉबेरी आता जिल्ह्यातील जुने कायगाव येथे पिकू लागली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करणा-यांसमोर कॅप्टन प्रकाश थोरात यांनी स्ट्रॉबेरीच्या शेतीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
थोरात भारतीय सेनेचे माजी कॅप्टन आहेत. त्यांनी बारा वर्षे शासन सेवेत वरिष्ठ हुद्द्यावर काम करीत असताना ऐच्छिक निवृत्ती पत्करून शेती करण्याचा संकल्प केला. शेतीची पार्श्वभूमी नसताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर शेती करण्याचा निर्णय घेतला. थोरात यांच्यावर इस्त्राइलच्या शेतीचा प्रभाव असून शेतीसाठीच्या अभ्यास दौºयावर ते दोन वेळेस इस्रायल येथे भेट देऊन आले आहेत.
चार वर्षांपूर्वी थोरात यांनी गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे शेती घेऊन शेतीस सुरुवात केली. सुरुवातीला सिमला मिरची, टरबूज, शेवगा, भाजीपाल्याची शेती करत असताना शेडनेटमध्ये दोन ताळीवर आद्रकाची शेती करून वेगळा ठसा निर्माण केला होता.
अशी केली लागवड : शेतीत एका एकरात एक शेडनेट अशा प्रकारचे नियोजन केले. त्यात एक एकर क्षेत्रावर नोव्हेंबर महिन्यात स्वीट चार्ली वाणाची 13 हजार 200 स्टॉबेरीची लागवड केली. स्टॉबेरीची रोपे महाबळेश्वर येथून सात रुपये प्रतिरोप या दराने खरेदी केले.
लागवड पद्धत : शेडनेटमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी दगडांची खडी पसरण्यात आली आहे, तर केरळ येथून आणलेला नारळाचा भुसा (कोको पीठ) टाकण्यात आला असून त्यात ड्रप मध्ये 1 बाय 1 अंतराने स्टॉबेरीची रोपे लावण्यात आली आहेत.
पाणी व्यवस्थापन : पाण्याचे पूर्ण नियोजन ठिबक सिंचनाच्या साह्यााने केले आहे.