आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॅरीऑन'ची मागणी; विद्यार्थ्यांचे आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑगस्ट महिन्यामध्ये फार्मसीचा निकाल लागला. यात विद्यार्थ्यांना उत्तीर्ण, एटीकेटीचे गुणपत्रक देण्यात आले, परंतु नंतर एटीकेटीचे स्वरूप बदलले आणि नव्याने निकाल लावला. यात अगोदर उत्तीर्ण झालेल्या तसेच एटीकेटीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले. अनेकांचे वर्ष वाया गेल्याने 'कॅरीऑन'च्या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बी. फार्मसीचे विद्यार्थी तसेच युवक क्रांती दलातर्फे आंदोलन करण्यात आले.

युवक क्रांती दलाचे राज्य संघटक पंडित तुपे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर जवळपास अडीच ते तीन तास आंदोलन केले. एटीकेटीचे स्वरूप बदलल्यामुळे बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळत नसल्याने फटका बसला. प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी नंतर कुठलाही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले हाेते. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलन केले. आंदोलनानंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यामध्ये कुलगुरूंनी पहिल्यांदा उत्तीर्ण, एटीकेटीचे देण्यात आलेले गुणपत्र ग्राह्य धरले जाणार असून येत्या दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असून अभियांत्रिकीप्रमाणे फार्मसीच्या 'कॅरीऑन'संदर्भात गुरुवारी प्राचार्यांसोबत बैठक होईल, असे तुपे यांनी सांगितले.
विद्यापीठात फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. छाया : मनोज पराती