आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आय वील थ्रो यु आउट' केले उद्देशून वाक्य, प्राचार्यांनी केस धरून ओढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- वर्ग शिक्षकेने विद्यार्थ्याच्या दिलेल्या लेखी तक्रारीचा निपटारा करण्यासाठी प्राचार्य वर्गात आले. तेव्हा “आय वील थ्रो यु आउट’ असे प्राचार्यांना उद्देशून वाक्य लिहून दाखवले. त्यामुळे संतापलेल्या प्राचार्यांनी मुलाला केस धरून आेढत बाहेर नेत त्याला मारहाण केली. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पालकांनी प्राचार्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पाल्याला केस धरून वर्गातून व्हरांड्यात ओढत आणले, दमदाटी करून धक्काबुक्की केल्याची तक्रार प्रवीणभाई खेमजी मन्वर (रा.सिल्लोड) यांनी बुधवारी सकाळी पोलिस ठाण्यात केल्याने युनिव्हर्सल अकॅडमीच्या जी.ए.शहा  इंग्लिश स्कूलचे प्राचार्य राहुलदेव भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीणभाई खेमजी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ११ जुलै रोजी सकाळी दहा ते सव्वादहा वाजण्याच्या सुमारास वर्गात असताना प्राचार्य भगत यांनी आपला पाल्य डेव्हिड यास गणवेश का घातला नाही असे म्हणून केसांना धरून वर्गातून व्हरांड्यात ओढत आणले.

पालकांची मागितली माफी  
झाला प्रकार पोलिसांपर्यंत गेल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी शनिवार दि.१५ रोजी पालकांची बैठक बोलाविली होती. बैठकीस अन्य विद्यार्थी यांचे पालकही आले, परंतु शिंदे यांच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत  गंभीर गुन्हा घडल्याने ते बैठकीला जाऊ शकले नाही, परंतु झाल्या प्रकाराबद्दल बैठकीसाठी आलेल्या पालकांची मी माफी मागितली, असेही भगत यांनी सांगितले.

वचक बसावा अशा पद्धतीत रागावलो, केस धरले 
प्राचार्य राहुलदेव भगत यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, मी डेव्हिड यास मारलेले नाही. खोडकर विद्यार्थी यास वचक बसावा म्हणून अशा प्रकारे वागलो. डेव्हिड मन्वर त्रास देते अशी तक्रार वर्गशिक्षकाने लेखी स्वरूपात केल्याने मी दहावीच्या वर्गात पाहणीसाठी गेलो व त्यास  तू उद्धटपणे वागतोस अशी तक्रार आहे, याची जाणीव करून देऊन त्यास समजावून सांगितले. स्वत: दहावीच्या वर्गात काळ (टेन्स)  शिकविण्यास सुरुवात केली. भूत, वर्तमान व भविष्य काळाचे वाक्य तयार करण्यास सांगितले. त्याने माझ्याकडे बघून व बोट दाखवून ‘आय वील थ्रो यु आउट” असे वाक्य तयार केले. मी अचंबित झालो. त्यास वर्गाबाहेर  माझ्या केबिनपर्यंत घेऊन आलो व वचक बसावा अशा पद्धतीत रागावलो, केस धरले.   
बातम्या आणखी आहेत...